सामाजिक

पत्रकार स्वामीराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )पत्रकार तथा संपादक स्वामीराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीतील कार्यालयामध्ये चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा शाल स्वामींची  प्रसाद प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांनी पत्रकार स्वामीराव गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी पत्रकार रमेश भंडारी , पत्रकार राजेश जगताप , श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मीडिया सेल प्रमुख श्रीशैल गवंडी , प्रसाद सोनार , गिरीष पवार ,श्रीकांत मलवे , रमेश शिंदे ,सुनिल पवार , सागर गोंडाळ आदी उपस्थित होते.पत्रकार स्वामीराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक , शैक्षणिक ,राजकीय , पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button