सामाजिक
अक्कलकोट शहरातील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील बॅगेहल्ली रस्त्यावरील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयात महापुरुषांची संयुक्त जयंती १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी भगवान गौतम बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज , विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा बसवेश्वर महाराज , महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाचे आयोजन राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे चेअरमन तथा रिझर्व बँकेचे निवृत्त मॅनेजर दिलीप कदम यांनी केले होते. या कार्यक्रमास. शिवपुत्र घटकांबळे (उपाध्यक्ष यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशी वेल्फर असोसिएशन महाराष्ट्र
राज्य ) कमलाकर कांबळे ( जिल्हा जिल्हाध्यक्ष शाखा सोलापूर )पत्रकार रमेश भंडारी , स्वामीराव गायकवाड ,. राजेश जगताप, सिद्धाराम घटकांबळे, थंब काका भीमाशंकर घटकांबळे , दिलीप शिवशरण,
वसंत शिवशरण, शिवशंकर गुंजले , शिवाजी मिस्त्री, श्रीशैल शिवशरण आदीची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी बोलतानादिलीप कदम म्हणाले महापुरुषांची विचारधाराही समाजाला तारणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा बसवेश्वर महाराज आदी महापुरुषांनी बहुजन समाजाला विचारधारा दिली असून या विचारधारेवरच बहुजन समाजाने प्रगती करावी महापुरुषांचे विचारधारा हे सर्वकाळ समाजाला मार्गदर्शक ठरणारी आहे असे सांगितले.याप्रसंगी शिवपुत्र घटकांबळे , स्वामीराव गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम बालक बालिका उपासक, उपासिका उपस्थित होते.कार्यक्रमानंतर उपस्थित त्यांना दिलीप कदम यांच्या हस्ते खिरीचे वाटप करण्यात आले.






