Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या  भक्तीमय वातावरणात संपन्न 

Admin by Admin
April 2, 2026
in सामाजिक
0
गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या  भक्तीमय वातावरणात संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (-प्रतिनिधी ) अक्कलकोट
तालुक्यातील गौडगाव येथील हेमाडपंथी दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.फुलांची आकर्षक सजावट आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या दिव्य रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.​उत्सवाचे मुख्य आकर्षण आणि धार्मिक कार्यक्रम जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
     बुधवारी रात्री जेऊर येथील पांडुरंग महाराज यांचे प्रवचन आणि गौडगावच्या मल्लिकार्जुन भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.गुरुवारी पहाटे ३ वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला.यावेळी मारुतीरायाला रुद्राभिषेक,नवग्रह पूजन,होमहवन, महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. मारुतीची पालखी मिरवणूक मंदिर परिसरासह माळी गल्ली,सुतार गल्ली आणि कुंभार गल्लीतून वाजत-गाजत निघाली.महिलांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले.
     हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने गौडगाव नगरी ‘जय श्रीराम,जय हनुमान’च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.दिवसभरात हजारो भाविकांनी मारुतीरायाचे दर्शन घेतले.​शेकडो भाविकांनी एकत्रित येऊन हनुमान चालीसा पठण केले.यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण होते.
 मारुती मंदिर आणि अन्नछत्र मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी सुरू झालेला हा महाप्रसाद रात्री उशिरापर्यंत सुरू होता.मंदिर कमिटीच्या वतीने दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आलेल्या सर्व भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली, 
    स्थानिक देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली.श्रद्धेचा आणि उत्साहाचा अनोखा संगम असलेल्या या उत्सवासाठी केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.​या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तीमय झाले.चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांचा ओघ सुरूच होता.
चौकट –
सोहळ्याचे स्वरूप इतके भव्य होते की,गेल्या दोन दिवसांपासूनच मंदिर परिसरात भाविकांचे आगमन सुरू झाले होते.परराज्यातून आलेल्या भाविकांमुळे या सोहळ्याला एका मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.हजारो भाविकांची उपस्थिती असूनही देवस्थान समितीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप केले.भाविकांनी रांगेत उभे राहून शांततेत प्रसादाचा लाभ घेतला.’
सिद्राम वाघमोडे खजिनदार – श्री मारुती अन्नछत मंडळ गौडगांव
चौकट –
‘भक्ती आणि शक्ती’चा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.संपूर्ण मंदिर परिसर टाळ-मृदंगाचा गजर आणि जयघोषाने दुमदुमून गेला होता.​”हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.सर्व भाविकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.”
याप्रसंगी श्रीकांत खानापुरे अध्यक्ष, देवस्थान समिती यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर फुलारी बीरपा पुजारी परमेश्वर सुतार प्रकाश मेंथ 
भारत ननवरे प्रकाश 
 सनकळ , शांतया मठपती मल्लू म्हेत्रे श्रीमंत सवाळतोट , श्रीमंत म्हेत्रे ,मल्लिनाथ शेरीकर पाटील , रमेश वाघे , श्रीशैल आहेरवाडी , शरणाप्पा नाटेकर ,  आमसिद्ध कोरे , भीमना हडपद , बळी माशाळकर, श्रीशैल बनसोडे व समस्त गावकरी उपस्थित होते.
Previous Post

कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी ; कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी

Next Post

पुण्यात  अवघ्या दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे शहराची दाणादाण

Admin

Admin

Next Post
पुण्यात  अवघ्या दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे शहराची दाणादाण

पुण्यात  अवघ्या दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे शहराची दाणादाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (8)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157306
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697