Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तुळजापूरात काँग्रेस पक्षाच्या शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचा समारोप

Admin by Admin
March 30, 2026
in राजकीय
0
तुळजापूरात काँग्रेस पक्षाच्या शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचा समारोप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तुळजापूर – सोमवारी सकाळी धाराशिव जिल्हयातील  तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष . हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष न्याय यात्रा काढण्यात आली.  या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. LPG गॅस संकटाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी LPG गॅस सिलेंडर ठेवलेले ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सामील झाले होते. दुपारच्या सत्रात तुळजापूर शहरातील कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली व त्यानंतर प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली व यात्रेचा समारोप तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने झाला.

आज शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे आहेत, जेव्हा कर्जमाफी मिळेल तेव्हाच खरे, असे म्हणत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष . हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यावेळी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष . विलास औताडे, यात्रेचे समन्वयक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस  जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस . आदित्य अशोकराव पाटील, . दादासाहेब मुंडे,  अमर खानापुरे, डॉ. स्मिता शहापूरकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. लताताई मोरे, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष . आप्पासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे संघटक  राजेंद्र शेरखाने, प्रदेश काँग्रेसचे सचिव  पांडुरंग कुंभार, . प्रशांत पाटील,  अग्नीवेश शिंदे,  उमेश राजे निंबाळकर, प्रवक्ते  हनुमंत पवार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष  विलास शाळू, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  राहुल सोनावणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष  सतलिंग शेटगार, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  राजेश पावडे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते, पदाधिकारी यांच्यासह महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

 

Previous Post

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; २ मे ते १४ जून दरम्यान शाळा राहणार बंद

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारी यांचा सत्कार

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारी यांचा सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात डबल महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारी यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156948
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697