सामाजिक

खाकीतला खरा माणूस — पोलीस जमादार गणपतराव राठोड यांची माणुसकीची अनोखी झलक

 

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर )

नायगाव तालुक्यातील नरसी फाटा येथील पोलीस चौकी येथे खाकी वर्दी ही केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नसून तिच्यामागे माणुसकीची भावना दडलेली असते, याची जिवंत प्रचिती नरसी पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस जमादार गणपतराव राठोड यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर आणून दिली आहे.नरसी फाटा येथे एका अंध विद्यार्थ्याला रस्ता ओलांडताना अडचण येत असल्याचे पाहताच.पोलीस जमादार गणपतराव राठोड. यांनी तत्काळ पुढे येत त्याचा हात धरून त्याला सुरक्षितपणे रस्ता पार करून दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या विद्यार्थ्याला जवळील हॉटेलमध्ये नेऊन स्वतःच्या खिशातून त्याला चहा-पाणी व नाश्ता करून दिला आणि त्याला पुढील प्रवासासाठी मदत केली.गेल्या सात ते आठ वर्षांपासून नरसी फाटा येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस जमादार गणपतराव राठोड हे आपल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपत आहेत.त्यांच्या या छोट्याशा पण हृदयस्पर्शी कृतीतून खाकी वर्दीत दडलेली माणुसकी आणि संवेदनशीलता समाजासमोर दिसून आली आहे.त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून “खाकीतला खरा माणूस” म्हणून त्यांचे गुणगान केले जात आहे. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीमुळे पोलीस दलाबद्दल समाजात आदर आणि विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना जनतेतून व जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button