सामाजिक

सयाजीराव गायकवाड महाराज यांची आज जयंती

सयाजीराव गायकवाड महाराज यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा.त्यांच्या कल्याणकारी कार्याचा संक्षिप्त परीचय
1. सयाजीराव गायकवाड महाराजांचा राज्याभिषेक दि. 28-12-1881  रोजी झाला.
2.जुबली पार्क बडोदा येथे बुद्ध पुतळा बसवला.
3. धर्मानंद कोसंबी यांची बुद्ध-धम्म यावर राजवाड्यात पाच व्याख्याने आयोजित केली. या पाच व्याख्यानांचे पुस्तक छापण्यासाठी ५०० रू. दिले.
4. धर्मानंद कोसंबी यांना पाच वर्षे शिष्यवृत्ती दिली, अट मराठीत धम्मावर पुस्तक लिहिण्याची !
5. फर्ग्युसन  कॉलेजमधील पालि भाषेला आठ वर्षे शिष्यवृत्ती दिली. 
6. संस्थानातील शाळा व कॉलेजमध्ये पालि हा विषय सुरू केला. 
7. ‘दीघनिकाय’ या बौद्ध ग्रंथाचे दोन खंड मराठीत भाषांतर करून छापले. दुसरा खंड बुद्धप्रेमी डॉ. नायर यांना अर्पण केला.
8. डॉ. नायर यांनी उभारलेल्या आनंद  विहाराचे उद्घाटन महाराजांनी केले.
9. बेंगॉल बुद्धिस्ट असोसिएशनने त्यांच्या धम्मकार्याबद्दल त्यांचा सत्कार केला. त्यावेळी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांना संस्थानातील कार्याला मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. 
10. अनेक भाषणांत बुद्धासंबंधी ते बोलत असत. त्यांना धम्माविषयी विशेष आस्था होती. 
11. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाविद्यालयीन व परदेशातील उच्चशिक्षणासाठी साहाय्य केले.
12. लो. टिळक, माता सावित्रीबाई व योगी अरविंद यांना साहाय्य केले.
13. शिकागो येथील दुसऱ्या सर्व धर्म परिषदेचे अध्यक्षपद महाराजांनी भूषविले.
14. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात त्यांनी खूप मोठे योगदान दिले.
त्यांच्या या कार्याला  विनम्र अभिवादन! !!!!!
 — सुरेश सोनवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button