सामाजिक

दुधनी म्हेत्रे प्रशालेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे सत्कार सोहळा संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दुधनी येथे मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला व श्री गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय येथे मातोश्री लक्ष्मीबाई सातालिंगप्पा म्हेत्रे यांच्या  ३०  व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित दुधनी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे विजयी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका यांचे सत्कार सोहळा कार्यक्रम दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती श्री म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्यसानिध्यात आणि संस्थेचे चेअरमन शंकर  म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
   कार्यक्रमाची सुरुवात लिंगैक्य श्री. गुरुशांतलिंगेश्वर, ज्येष्ठ नेते स्व. सातालिंगप्पा म्हेत्रे आणि मातोश्री लक्ष्मीबाई सातालिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने उपस्थित सत्कारमूर्तींचे आणि मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व कॉलेजचे प्राचार्य सिद्धाराम पाटील यांनी शाळेचे सर्वांगीण विकास आणि क्रीडाक्षेत्रात जिल्हास्तरापर्यंत होत चाललेली प्रगती या विषयावर आपले मत मांडत शाळेचे प्रलंबित प्रश्न मांडले. त्याचबरोबर शाळा व कॉलेज तर्फे विजयी शिलेदारांच्यां पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
त्यानंतर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे शाल, मोत्यांचे माळ, म्हैसूर पेठा , पूर्ण आहेर आणि डायमंड अंगठी घालून यथोचित सन्मान करण्यात आले. उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक व नगरसेवकांचे देखील शाल, म्हैसूर पेठा , मोत्यांचे हार आणि फळ देऊन सन्मान करण्यात आले. याप्रसंगी तोळणूरचे सुप्रसिद्ध गायक ज्यांच्या गीताने महाराष्ट्र आणि कर्नाटकात आपले नवी ओळख निर्माण केलेले रेवणसिध्द फुलारी मनमोहन गीत गाऊन सर्वांचे मन जिंकले. नगरसेवक बसवराज हौदे यांनी आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण आत्मसात करून घेण्यासंदर्भात सांगत सर्व विजयी नगरसेवकांचे शाळा व कॉलेज कडून सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
यानंतर नुकतेच संत चोखामेळा सेवा मंडळ आळंदी कडून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले प्राचार्य सिद्धाराम पाटील यांचे देखील सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आले. पाटील सरांच्या कार्याबद्दल प्रा. राजकुमार बिराजदार सरांनी आपले मत मांडत त्यांना शुभेच्छा दिले. नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी देखील बोलताना म्हणाले , जे काही शाळेचे प्रलंबित प्रश्न आहेत ते आपण येत्या सभेत विषय मांडून तुमचे प्रश्न सोडवू तसेच विद्यार्थांसाठी स्वतंत्र असे स्वच्छतागृह बांधू या व्यतिरिक्त अजून काही समस्या असतील ते आम्ही दूर करू असे आश्वासन देत येत्या काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, निरोगी आरोग्यासाठी अनेक सोयी सुविधा, क्रीडासाठी भव्य मैदान व त्यामध्ये महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाची गैरसोय होत असल्याने त्यांच्यासाठी अत्याधुनिक व सर्व सोयी सुविधाने सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण करू असे सांगुन शाळा व कॉलेजचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आपले सन्मान केल्याबद्दल आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार,शरणगौडा पाटील, महादेव खेड, सिद्धराम येगदी, रामचंद्र गद्दी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कल्याणी करडे सरांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button