सामाजिक
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या अक्कलकोट तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी अँड. फारियाशाजनिन म.इकबाल.टिनवाला यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या अक्कलकोट तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी अँड. फारियाशाजनिन म.इकबाल.टिनवाला यांची निवड करण्यात आली. सदर नियुक्ती ही दिनांक २६ / २ / २०२६ पासून पुढील तीन वर्षाकरिता किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील सदर दिलेले पद हे मानद स्वरूपाचे असून भारतीय संविधान भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता याचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा. तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. अँड फारियाशाजनिन टिनवाला यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ राज्याध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी नियुक्ती पत्र दिले.
अँड फारियाशाजनिन टिनवाला यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, मा.गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,अमोलराजे भोसले,उपाध्यक्ष सोलापुर जिल्हा स्वामीनाथ हेगडे,कार्याध्यक्ष महिला विभाग पश्चिम महाराष्ट्र वैशाली हावनूर,शिवसेना तालुका अध्यक्ष वर्षा चव्हाण,सुरेश सूर्यवंशी, मा.नगरसेवक सुभाष पुजारी, मा.नगरसेवक रईस टिनवाला,इकबाल टिनवाला,इरफान टिनवाला, अर्फिया टिनवाला,मजहर टिनवाला, अलतस टिनवाला, रजाक सय्यद, मा.नगरसेवक मतीन पटेल,नूरुद्दीन बागवान (सोलापुरे), अल्तमाश घोळसगांवकर,प्रभु देवर,महेश भरडे, सुजीत क्षीरसागर,प्रशांत टिकोळे,विवेक मुसळे,, व्यंकटेश देशपांडे,गोविंद मंद्रुपकर आदिनी अभिनंदन केले.



