राज्यात एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोटहिस्सा स्वतंत्रपणे मोजून देण्यात येणार

मुंबई –
राज्यात एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोटहिस्सा स्वतंत्रपणे मोजून देण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्यातील सरकारने पोटहिस्सा मोजणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पोटहिस्सा मोजणीसाठी फक्त 200 रुपये घेतले जाणार आहेत. तर 90 दिवसांत पोटहिश्यांची मोजणी होणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्यात जमिनीच्या वाढत्या किमती आणि वारसाहक्कातून निर्माण होणाऱ्या वादांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱी बांधवांसाठी पोटहिस्सा स्वतंत्रपणे मोजून देण्याचा हा निर्णय घेतला आहे.
सातबारा उताऱ्यावर एकाच कुटुंबातील नाव नोंद असलेल्या व्यक्तींना आता आपापल्या पोटहिश्याची मोजणी 200 रुपयांत करून मिळणार आहे. या सरकारच्या निर्णयामुळे रक्तनात्यातील जमीन विवाद, अतिक्रमण आणि हद्दीवरून होणारे तंटे कमी होणार आहेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नियमित निकषांनुसार 90 दिवसांत जमीन मोजणी केली जाणार आहे, व जमिनीच्या हद्दी निश्चित करून दिल्या जाणार आहेत. राज्यात सध्या शेतीजमिनींचे दर लाखोंमध्ये गेले आहेत.
अलीकडे राज्यात काही ठिकाणी जमिनीचा लहानसा बांध, पायवाट किंवा वहिवाटीच्या मार्गावरूनही शेतकरी बांधवांमध्ये जमिनीचे वाद वाढत चालले आहेत. जमिनीचा बांध पोखरणे, शेतात अतिक्रमण करणे, रस्त्याच्या हक्कावरून भांडणे, अशा अनेक कारणांमुळे अनेक जमिनीच्या वादाची प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात जमिनीच्या वादाची प्रकरणे रोज वाढत आहेत. त्यामूळे शेतकरी बांधवांमध्ये जमिनाच्या वादातून हाणामारीची प्रकरणे होत आहेत.
अनेक पोलिस ठाण्यांमध्ये रोज शेतकर्यांच्या जमिनीच्या केसेस येत आहेत. राज्यात सोलापूर जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयाकडे दररोज 200 पेक्षा अधिक शेतकरी बांधव जमिनीचे क्षेत्र मोजणीसाठी अर्ज करत असल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जमिनीच्या प्रकरणांत मोजणी चालू असताना मोठा तणाव निर्माण झाल्याच्या घटना सोलापूर जिल्ह्यात घडल्या आहेत. राज्यात अशा जमिनीच्या वादातून मोठ्या तणावाच्या घटनामध्ये वाढ होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांना सरकारी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे, अशी परिस्थिती राज्यात सध्या आहे.
राज्यातील या वाढत्या जमिनीच्या तक्रारी लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यात सातबारा उताऱ्यावर एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावावरील पोटहिस्सा स्वतंत्रपणे मोजून देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या आधी अशा मोजणीसाठी मोठा खर्च आणि दीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, या सवलतीमुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकऱी बांधवाना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात आता लवकरच शेतकरी बांधवांच्या जमिनीच्या पोटहिश्यांची स्वतंत्रपणे मोजणी करता येणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्यातील भूमिअभिलेख कार्यालयात सध्या मनुष्यबळाची कमतरता असली तरी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन अर्ज केलेल्या सर्व जमीन प्रकरणांची मोजणी नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, मोहोळ आणि माळशिरस तालुक्यांमधून जमिनीच्या पोटहिश्यांच्या मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.
संयुक्त कुटुंबांतील सर्वसामान्य शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सातबारा उताऱ्यावर एकूण क्षेत्राची कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटणी झालेली असते. प्रत्येकाच्या नावापुढे क्षेत्रफळ नोंदलेले असते. मात्र त्या जमिनीच्या क्षेत्राची नेमकी दिशा, सीमा आणि हद्दी उताऱ्यावर स्पष्ट नसतात. त्यामुळे माझी जमीन कुठपर्यंत? यावरून भविष्यात शेतकरी बांधवांमध्ये वाद निर्माण होतात. राज्यात पोटहिस्सा मोजणीद्वारे प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या जमिनीची अचूक हद्द निश्चित केली जाते आणि नकाशावर स्पष्टपणे दाखवली जाते.
यामुळे पुढील पिढ्यांपर्यंत चालणारे वाद आता बंद होणार आहेत. राज्यातील भूमिअभिलेख कार्यालयांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित जमीन क्षेत्रधारकांना अधिकृत ऑनलाइन संकेतस्थळावर जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत जमिनीच्या पोटहिश्यांची मोजणी करून हद्दी निश्चित केल्या जाणार आहेत. हा राज्य सरकारचा निर्णय शेतकऱी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. राज्यातील शेतकरी बांधवांच्यातील जमिनीवरून होणारा वाद आता कमी होणार आहे, असे भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकार्यांनी म्हटले आहे.
या जमिनीच्या स्वतंत्र पोटहिस्सा मोजणीमूळे राज्याच्या ग्रामीण भागात कायदेशीर जमिनीचे वाद कायदेशीर पध्दतीने कमी होणार आहे, आणि शेतकरी बांधवांमध्ये सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामूळे राज्य सरकारने जमिनीच्या पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय घेतला आहे. आता जमिनीच्या पोटहिस्सा मोजणीसाठी फक्त 200 रुपये भरावे लागणार आहे, आणि अर्ज केल्यानंतर 90 दिवसांच्या आत शेतकरी बांधवांच्या जमिनीच्या पोटहिश्यांची स्वतंत्रपणे मोजणी होणार आहे.



