महाराष्ट्र

संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

 

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम )
संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अपंग निवासी विद्यालय शाळा नरसी फाटा येथे शालेय साहित्य वाटपाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी समाजप्रबोधन व सेवाभावाची परंपरा जपणाऱ्या गाडगे महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करत विद्यार्थ्यांना खाऊ वह्या, पेन,व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष समारोप दरम्यान सोनखेडकर म्हणाले, समाजप्रबोधन, स्वच्छता, शिक्षण आणि लोककल्याणाचा संदेश देणारे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक व लोकाभिमुख उपक्रम राबवत त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य कैलास तेलंग यांनी उत्साहात पार पाडले.
तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून तेलंग यांनी जयंती सोहळा केवळ औपचारिक न ठेवता तो समाजप्रेरणेचा उत्सव बनविला आहे.या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत जिल्हा मराठी पत्रकारसंघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी तेलंग यांच्या उपक्रमांचे कौतुक करत, “संतांच्या विचारांचा वारसा कृतीतून जपणारे तेलंग हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत,” अशा शब्दांत स्तुती केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप वाघमारे (जिल्हा संघटक, जिल्हा मराठी पत्रकार संघ, गोविंद नरसीकर तालुका उपाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ नायगाव, तसेच कार्यक्रमाचे आयोजक कैलास तेलंग टेंभुर्णीकर, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र डेबुजी फोर्स व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए. एल. हिमगीरे उपस्थित होत्या.
नरसी येथील अपंग निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ हिमगीरे अनुसाय यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये म्हणाल्या संत गाडगेबाबांच्या स्वच्छता, शिक्षण व समाजसेवेच्या कार्याचा गौरव केला. “शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे,” असे प्रतिपादन करत उपस्थित विद्यार्थ्यांना जिद्द, परिश्रम व आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद तमशेटे पि. जी,सौ.वाघमारे पि.एम, सौ तमशेटे पि.जी, भालके एस.जी, बेद्रे ए. आर, कुऱ्हाडे एस.एम, शिंदे व्ही.एन, सौ गवलवाड. इ.एल,मांजरमकर ए. एस, बागवान एम.आर सह शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button