Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट जि . प. व पंचायत समिती निवडणूकीत ५३ उमेदवार रिंगणात , जि.प.साठी १८ तर पं.स . साठी ३५ उमेदवार रिंगणात

Admin by Admin
January 28, 2026
in राजकीय
0
अक्कलकोट जि . प. व पंचायत समिती निवडणूकीत ५३ उमेदवार रिंगणात , जि.प.साठी १८ तर पं.स . साठी ३५ उमेदवार रिंगणात
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील सहा जिल्हा परिषद
गट व १२ पंचायत समिती गणांसाठी मंगळवारी
२७ जानेवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरपर्यंत
१७६ पैकी ११० उमेदवारांनी माघार घेतली आहे.
जिल्हा परिषदेच्या ६ गट आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी असे एकूण
१८ जागेसाठी ५३ उमेदवार रिंगणात राहिले
आहेत. जि. प. साठी १८ तर पंचायत समितीसाठी ३५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
याबाबतची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनायक मगर यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भाजपा सर्व १८ जागा
लढवत असून शिवसेना शिंदे गट १२, काँग्रेस
५ व राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागा लढवत आहे.
वागदरी गण व गट या दोन ठिकाणी काँग्रेस व
शिंदे शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होत आहेत.
शिवसेना शिंदे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार गट भाजपा विरुद्ध एकत्र लढत
असून शिवसेना शिंदे ४ जिल्हा परिषद गट व ८
पंचायत समिती गण लढवत आहेत. तर काँग्रेस
दोन जिल्हा परिषद व तीन पंचायत समिती लढवत
आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मंगरुळ
एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती गण
लढवत आहेत.
चपळगाव व मंगरूळ या दोन जिल्हा परिषद
गटात प्रत्येकी दोनच उमेदवार राहिले असून थेट
भाजपा व शिवसेना शिंदे गट यात लढत होत आहे.
जेऊर, मंगरूळ, नागणसुर, तोळणूर, मुगळी या
पाच पंचायत समिती गणात थेट लढत होत आहे.
 वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र एक
जिल्हा परिषद व तीन पंचायत समिती गण लढवत
आहेत.रासप स्वतंत्र दोन जिल्हा परिषद व तीन पंचायत समिती गण लढवत आहेत. 
पंचायत समिती चपळगाव गण  (सर्वसाधारण) –
सागर कल्याणशेट्टी (भाजपा), अशपाक अगसापूरे
( शिवसेना शिंदे गट) नितीन गजधाने ( वंचित), राजेंद्र स्वामी(भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी), कुरनूर गण ( सर्वसाधारण) : -व्यंकट मोरे (शिवसेना शिंदे गट), विनोद मोरे (भाजपा), अमृत सोनकांबळे (वंचित), रविनाथ घोडके (रासप)
शिरवळ गण -(सर्वसाधारण): गणेश मोरे (शिवसेना शिंदे गट), बबन गायकवाड (वंचित), राजेंद्र बंदीछोडे
(भाजपा), दत्तात्रय माडकर (रासप)
वागदरी गण (सर्वसाधारण): अप्पासाहेब किवडे
(भाजपा), राजेश घुगरे (काँग्रेस), संजय होळे
( शिवसेना शिंदे गट), सोमलिंग सलगरे (रासप )
दहिटणे गण (अनुसूचित जाती
महिला): – आशा इंगळे (भाजपा), अनिता नडगम
(काँग्रेस)  फुलाबाई गायकवाड (अपक्ष) , जेऊर
गण (सर्वसाधारण): श्रुती पाटील (काँग्रेस), विमल
गव्हाणे (भाजपा),. सुरेजवळगे गण (अनुसूचित
जाती) : प्रल्हाद वाघमारे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित
पवार गट), उत्तम वाघमारे (भाजपा) शुषेकांत कांबळे (अपक्ष) ,. मंगरूळ गण (नामप्रा महिला) :
लक्ष्मी हिप्परगी (भाजपा) भुवनेश्वरी कोरशेट्टी
(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) , नागणसुर गण
(सर्वसाधारण महिला) : स्वाती उडचाण (शिवसेना
शिंदे गट) वैष्णवी सलगरे (भाजपा),
तोळणूर गण (नामप्रा महिला) शीतल म्हेत्रे
( शिवसेना शिंदे गट) सविता सोलंकर (भाजपा)
 सलगर गण (नामप्रा): शिवराज बिराजदार
(भाजपा), भीमण्णा सोलापुरे (शिवसेना शिंदे गट)
 अपक्ष अशोक ढोणे , मुगळी गण (सर्वसाधारण
महिला) : संगीता पाटील (शिवसेना शिंदे गट)
समृद्धी राठोड (भाजपा) 
 जि.प. गटातील लढती –
चपळगाव गट (सर्वसाधारण महिला ) –
चपळगाव शांभवी कल्याणशेट्टी (भाजपा),
सुजाता भरमशेट्टी (शिवसेना शिंदे गट) , वागदरी गट (ना मा प्र ) –
राजेश्री शेळके (भाजपा), प्रवीण तानवडे
(शिवसेना शिंदे गट)  मल्लिकार्जुन हत्ते(काँग्रेस) ,. जेऊर गट ( अनुसूचित जाती) अश्वघोष
बनसोडे (काँग्रेस), विकास बुळळा (भाजपा), यशवंत
इंगळे ( वंचित) सत्यम कट्टिमनी (अपक्ष),
भुताळी कांबळे (अपक्ष),. मंगरूळ गट, (अनुसूचित जाती महिला) सुज्ञानी बनसोडे (राष्ट्रवादी अजित
पवार गट), शिवानी स्वामी (भाजपा) ,
नागणसुर गट (सर्वसाधारण) धनराज धानशेट्टी
( शिवसेना शिंदे गट), सिध्दाराम शिवमूर्ती
(भाजपा). संतोष
शिंदे (रासप) ,. सलगर
गट (ना मा प्र ) सिध्दाराम बाके (भाजपा),
शिवराज म्हेत्रे (शिवसेना शिंदे गट). रासपाचे दत्तात्रय माडकर
(रासप)
Previous Post

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल महेश इंगळेंकडून भावपूर्ण श्रध्दांजली

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी स्मृतीदिन

Admin

Admin

Next Post
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी स्मृतीदिन

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी स्मृतीदिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156475
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697