राजकीय

पिपानीने वाजवली तुतारी म्हणून आला धनुष्यबान

 पिपानीला ४४४६ मत
धनुष्यबान १५०९ विजय

परंडा ( फारुक शेख )

राज्यात नुकताच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रामुख्याने जवळपास बहुतांश भूम परंडा वाशी मतदारसंघात ऐतिहासिक स्वरुपात लढत झालेली पहायला मिळाली. जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या परंडा २४३ विधानसभा मतदारसंघात सुध्दा महायुती आणि महाविकास आघाडीत अखेरच्या फेरी पर्यंत घासुन टक्कर झाली. यामध्ये महायुती कडुन प्रा डॉ तानाजी सावंत आणि महाविकास आघाडी कडुन राहुल मोटे यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळाली. एकुण २७ व्या फेरीतील २३ व्या फेरीदरम्यान मोटे आघाडीवर असताना शेवटच्या दोन फेरीत सावंत अंतिम निकालात १५०९ मतांनी विजयी झाले.

तब्बल १२ तास चाललेल्या मतमोजणी नंतर एकुण २१ उमेदवारांपैकी ारी सावंत यांना १०३२५४ तर मोटे यांना १०१७४५ मते मिळाली. निकालाअंती सावंत हे १५०९ मतांनी विजयी झाले. त्याचबरोबर पिपाणी चिन्ह असनारे अपक्ष उमेदवार म्हणून जमीलका महेबुब पठाण यांनाही ४४४६ मते मिळाली.

मोटे यांचे चिन्ह हे तुतारी वाजवणार मानुस होते. मतदारांना मतदान करताना तुतारी आणि पिपाणी हे दोन्ही चिन्ह किंबहुना सारखे वाटत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या अटातटीच्या लढतीत पिपाणी या चिन्हाला ४४४६ मते मिळाली. याचाच फटका तुत- ला बसुन अवघ्या १५०९ मतांनी पराभव झाला. पिपाणी हे चिन्ह नसते तर पिपाणी चिन्हाचे ४४४६ मते तुत- ारीला मिळाली असती. आणि मोटे विजयी झाले असते. म्हणुन पिपाणी नेच तुतारी चा पराभव झाला अशी सर्वत्र चर्चा चालु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button