नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत सय्यद तवक्लशाह रहीमतुल्ला अलैह यांचा संदल उर्स मोठ्या उत्साहात संपन्न

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर )
नांदेड जिल्ह्यातील नायगांव बाजार येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत तवक्कवशाह (रहमतुल्ला अलैह) यांचा संदल उर्स अति-उत्साहात व अत्यंत भक्तीभावाने,धार्मिक व शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गाह सय्यद तवक्कल शाहवली (रहेमातुलाह आलैह) यांच्या संदल उरुसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या संदल उर्स मुतवली शेख ईस्माईल रहेमानसाब मुल्ला. मुतवली शेख गन्नी अमीनसाब मुल्ला.मुतवली हाजी शेख युसुफ.अ हमीदसाब मुल्ला.मुतवली सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक हाजी शेख लतीफसाब रहीमसाब मुल्ला.यांच्या मार्गदर्शनाखाली संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.आज दिनांक १२.१.२०२६ रोजी (२२ रज्जब) दुपारी ३.०० वाजता हजरत तवक्लशाह (रहेमातुलाह आलैह) दर्गाह येथून संदल मिरवणुकीची सुरवात झाल्यानंतर जुना पोस्ट,भाजीपाला मार्केट,मार्केट कमिटी,पानसरे नगर, लहुजी साळवे नगर,आंबेडकर चौक,बस स्टँड, हेडगेवार चौक, शिवाजी चौक,जुना मोंढा आदी भागातून सदर मिरवणूक अखेर दर्गा परिसरात पोहोचली, हजरत सय्यद तवक्कल शाहवली. येथे नांदेड जिल्हय़ाचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांचे प्रतिनीधी सुधाकर बळवंतराव पा चव्हाण.व .धनंजय शंकरराव पा चव्हाण .यांच्या उपस्थितीत.यावेळेस बरेली येथील मुस्लीम धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहम्मद अफजलसाब व जमा मस्जिद चे इमाम महेबुब आलमसाब. याच्या हस्ते
दर्गावर संदल चढवून,फातेखानी,सलाम,दुवा झाल्यानंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले.उर्स संदल निमित्त संपूर्ण नायगाव बाजार भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते,दर्गाह परिसरात भाविकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली,या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,विशेष म्हणजे सर्व समाजातील नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमास सहकार्य केल्याने उर्स शांततेत व उत्साही वातावरणात पार पडला यावेळेस. मुतवली शेख रफीख ईब्राहीमसाब मुल्ला.शेख अहेमद मुल्ला.शेख गौस ईब्राहीमसाब मुल्ला.शेख बाबू जिलानी साब मुल्ला.शेख दाऊद इब्राहिमसाब मुल्ला.शेख मैनोदीन महेबुबसाब मुल्ला.शेख समदानी मुल्ला.शेख सलीम मुल्ला.शेख मुबिन हाजी युसुफसाब मुल्ला.शेख मैनोदीन मुल्ला.शेख बाबु बडे मिया मुल्ला.शेख कलीम मुल्ला.शेख अझहर मुल्ला.शेख गौस छोटे मिया मुल्ला.शेख महेबुब ईस्माईलसाब मुल्ला.शेख यनुस मुल्ला.शेख फयाज छोटे मिया मुल्ला.शेख अजीज मुल्ला.शेख जावेद मुल्ला.शेख इरफान मुल्ला. सर्व मुल्ला बिरादरी तसेच .गावातील हिंदू मुस्लीम असंख्य समाजबांधव उपस्थित होते.



