राजकीय
अक्कलकोट काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इच्छुक उमेदवाराच्यां मुलाखती संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवाराच्यां मुलाखती घेण्यात आल्या.
खासदार प्रणिती शिंदे,काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार ,महिला जिल्हा अध्यक्ष डॉ.सुवर्णा मलगोंडा,तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती घेण्यात आले.
आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष अक्कलकोट तालुक्यात संपूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे संकेत खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
या मुलाखतीस मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली.
तडवळ जिल्हा परिषद गटासाठी-४
पानमंगरूळ पंचायत समिती गणासाठी-२
सुलेरजवळगे पंचायत समिती गणासाठी-२
जेऊर जिल्हापरिषद गटासाठी-५
जेऊर पंचायत समिती-५
दहिटने पंचायत समिती-२
नागणसुर जिल्हा परिषद-२
नागणसुर पंचायत समिती-२
तोळनूर पंचायत समिती -२
चपळगांव जिल्हा परिषद-१
चपळगांव पंचायत समिती-४
कुरनूर पंचायत समिती-२
वागदरी जिल्हा परिषद-२
वागदरी पंचायत समिती-३
शिरवळ पंचायत समिती-२ , सलगर जिल्हा परिषद-१
सलगर पंचायत समिती-२
मुगळी पंचायत समिती-२ अशा मुलाखती घेण्यात आल्या.



