सामाजिक

परंडा येथील ५ वर्षीय जैद विजापूरेने कडक उन्हात पूर्ण केला रमझानचा रोजा

शहरातून होत आहे कौतुकाचा वर्षाव

परंडा (. प्रतिनिधी )परंडा येथील जैद नासीर विजापूरे याणी रमझानचा रोजा केला आहे .
सध्या कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमझान महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत मोठ्या माणसांनाही उपवास करणे कठीण जात असताना, परंडा शहरातील अवघ्या पाच वर्षे वयाच्या जैद नासीर विजापूरे या चिमुकल्याने कडक उन्हात आपला रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जैदने पहाटेची ‘सेहरी’ करून दिवसभर अन्न-पाण्याविना राहून आपला उपवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेली ही धार्मिक चिकाटी आणि जिद्द पाहून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सायंकाळी ‘इफ्तार’च्या वेळी जैदचे कुटुंबीय आणि व्यापारी व परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले.
सध्याच्या तापत्या उन्हात चिमुकल्या जैदने दिलेली ही ‘रोजाची’ परीक्षा परंडा शहरात चर्चेचा विषय ठरली असून, त्याच्या या जिद्दीचे सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत आहेत.परंडा शहरातून जयद यांचे कौतूक होत  आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button