नायगाव तालुक्यात ‘वेळ अमावस्या’ उत्साहात साजरी

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )
नायगाव तालुक्यात ‘वेळ अमावस्या’ साजरी करण्याची अनेक वर्षांची परंपरा असून, शुक्रवारी (दि. १९) ही अमावस्या तालुकाभर भक्तिभाव आणि उत्साहात साजरी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या परंपरेतून आगामी हंगाम भरभराटीचा जावा, शेतकरी सुखी-समृद्ध राहावा, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
खंडगाव बेंद्री येथील जिजाऊ विद्या संकुलाच्या व्यवस्थापन व विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून शेतामध्ये कडब्याची खोपी उभारून त्यात माता लक्ष्मीदेवीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजन, नैवेद्य अर्पण करून येणारा हंगाम भरघोस येऊ दे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या वेळी भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे, अध्यक्ष बाबुराव पाटील शिंदे, राजू पाटील शिंदे, भास्कर पाटील शिंदे, नायगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय चव्हाण, नगरसेवक शिवाजी पाटील, नागनाथ अनंतवाड, दत्ता पाटील होटाळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नरसी येथील सदन शेतकरी मारोती बुक्के यांच्या शेतातही कडब्याच्या खोपीत लक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना आंबीलचे वनभोजन देण्यात आले.
या प्रसंगी भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे, माजी सरपंच व्यंकट कोकणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गंगाधर वडगावे, हणमंत मिसे, पत्रकार गंगाधरराव गंगासागरे, बालाजी पांचाळ, संजय वाघमारे, बालाजी नरसीकर यांच्यासह शेतकरी, माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.



