पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना नायगाव शहरात अभिवादन

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर )
नायगाव तालुक्यात
ग्रामस्वच्छतेचे जनक, थोर समाजसुधारक व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नायगाव शहरातील त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या चौकात त्यांच्या नामफलकाचे व प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
शनिवारी सकाळी राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात स्वच्छता अभियान राबवून परिसराची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी दिलेल्या स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा व सामाजिक एकोपा यांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जपण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करत समाजाने अंधश्रद्धा, अस्वच्छता व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर व डेबूजी फोर्सचे प्रदेश अध्यक्ष कैलास तेलंग टेंभुर्णीकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी विनायक चव्हाण, माधवराव शिकारे, बालाजी खडके, बालाजी तळणीकर, कांतु खडके, राजेश हुसेकर, व्हिकी कौठेकर, संभाजी खडके, डेबूजी तेलंग यांच्यासह समाजातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



