करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांने उतारे देण्यासाठी पैसे मागितले

करमाळा ( आयुब शेख )
भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांने उतारे देण्यासाठी पैसे मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महसूल क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मूळचे कामोने येथील शेतकरी ब्रह्मदेव शिंदे हे आपल्या कामासाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयात गेले असता तेथील कार्यरत असणारा कर्मचारी कोकणे यांनी उताऱ्यासाठी दोनशे रुपयाची मागणी केली त्यानुसार शिंदे यांनी दोनशे रुपये दिले एका गरीब शेतकऱ्याला चक्क पैसे मागितलेने महसूल प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे याशिवाय सदरचे भूमी अभिलेख कार्यालय हे नेहमी आर्थिक देवाणघेवाण बाबतीत नियमित चर्चेत आहे या कार्यालयात आम सभेमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे अशी जोरदार मागणी झाली होती मात्र तरी देखील या कार्यालयामध्ये अद्यापपावेतो कोणत्याही पद्धतीचे सीसीटीव्ही बसवण्यात आले नाही याचाच अर्थ सीसीटीव्ही बसविण्यात न आल्यामुळे कर्मचारी राजरोस पणे आलेल्या शेतकऱ्याकडून पैसे घेतात याचाच अनुभव आज करमाळा तालुक्यातील कामोने येथील शेतकऱ्याला आला आहे
याबाबत ब्रह्मदेव शिंदे हे सदर कार्यालयात त्यांच्या जमिनीचा उतारा व नकाशा काढण्यासाठी गेले होते शिंदे यांना चार उतारे हवे होते यासाठी फक्त 80 रुपये लागत होते मात्र सदरच्या कर्मचाऱ्याने दोनशे रुपये मागितले त्यामुळे ना इलाज म्हणून शिंदे यांनी ते पैसे दिले याबाबत त्या शेतकऱ्यांनी पैसे घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण करमाळा तालुक्यात वायरल झाला आहे करमाळा शहरातील एका नामांकित पोर्टलने सदरचे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने सदरचा विषय हा महसूल प्रशासनामध्ये चर्चिला जात आहे
करमाळा शहरातील भूमी अभिलेख कार्यालय मध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावा अशी मागणी अनेक सामाजिक संघटनेने केली होती याशिवाय सदर कार्यालय मध्ये भ्रष्टाचाराला एक प्रकारे चाप बसवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली होती याशिवाय आमसभेमध्ये देखील सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली होती मात्र अद्यापही सदरच्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही तेव्हा सदर कार्यालयातील भ्रष्टाचाराचा फर्दाफाश करण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे अशी शेतकरी वर्गा मधून मागणी होत आहे.



