सामाजिक

मतदारांनी पैशाच्या मागे जाऊ नये, – प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखिका, मोटिवेशन ल स्पीकर पूजा डकरे यांचे मतदारांना आवाहन

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
सध्या राज्यात महानगरपालिका तसेच नगरपालिका निवडणुकी ची रणधुमाळी चालू आहे येत्या दोन नोव्हेंबर रोजी मतदान असून मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उमेदवार नाना पद्धतीचे प्रलोभने दाखवीत असतात यामध्ये पैशाचा सर्रास वापर केला जातो मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच कत्तल की रात या रात्री उमेदवार सर्रास मतदारांना आकर्षित करण्यासाठी करोडो रुपयाची वाटप करतात तेव्हा सुज्ञ मतदारांनी कोणत्याही पैशाला अथवा भूलथापांना बळी न पडता निर्भीडपणे आपले मतदान करावे आपले एक मत म्हणजे लोकशाहीला बळकटी देण्याचे काम करीत आहे तेव्हा माझ्या राज्यातील सर्व सुज्ञ मतदार बांधव तसेच भगिनींना माझे आवाहन आहे की कोणत्याही मतदारांनी पैसे घेऊ नये जर आपण पैसे घेतले तर आपण विकल्यासारखे होवू तेव्हा मतदारांनी विकाऊ न होता टिकाऊ व्हावे असे परखड मत अर्थतज्ञ, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखिका, मोटिवेशन ल स्पीकरपूजा डकरे यांनी बोलताना सांगितले

तेव्हा राज्यातील लोकशाही खरोखरच बळकट करण्या साठी आपण कोणत्याही उमेदवाराकडून पैशाचे आमिष न घेता योग्य पद्धतीने चांगल्या स्वच्छ पारदर्शी भविष्यात विकास कामे करणाऱ्या उमेदवारालाच आपले मत द्यावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button