Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अकोले येथे साऊ एकल महिला संस्थेचा ३ रा वर्धापनदिन साजरा

Admin by Admin
November 29, 2025
in महाराष्ट्र
0
अकोले येथे  साऊ एकल महिला संस्थेचा ३ रा वर्धापनदिन साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
   अहिल्यानगर –      कोरोना काळात एकल महिलांचे काम सुरू केल्यावर महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही साऊ ट्रस्टच्या वतीने साऊ एकल महिला समिती ही संस्था रजिस्टर केली..या संस्थेच्या वतीने अकोले तालुक्यात ४५० एकल महिला संपर्कात आहेत. १००० पेक्षा जास्त मुलांना आजपर्यंत बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला..आजपर्यंत ३१ महिलांचे व्यवसाय सुरू केले..२५० महिलांच्या मुलांना शैक्षणिक पालकांनी दत्तक घेतले..कालच रोजगार कार्यशाळा घेतली…कोरोना काळात एका महिलेला घर बांधून दिले तर राज्यात एकूण ३ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली. 
बाल संगोपन योजनेत ११५० चे पैसे वाढवावेत म्हणून आम्ही प्रयत्न केले व राज्यात एकेकाळी फक्त १६००० लाभार्थी या योजनेचे होते पण गावागावात कार्यकर्त्यांनी भरले आज ती संख्या दीड लाखापर्यंत गेली आहे.
             तालुक्यातील  साऊ संस्थेचा कामाबरोबर सर्वात आनंदाचा भाग हा आहे की हे काम आता राज्याच्या २८ जिल्ह्यातील ७० तालुक्यात स्थिरावले आहे. कोणतीही आर्थिक मदत नसताना आज महाराष्ट्रातील आमचे सर्व कार्यकर्ते महिलाना विविध रोजगार मिळवून देण्यापासून तर विविध कागदपत्र मिळवून देण्यापर्यंत विनामूल्य काम करतात..
             शासनासोबत पाठपुरावा करून खालील महत्वाचे निर्णय होऊ शकले
१) मिशन वात्सल्य या कोरोना काळात असलेल्या समितीची कक्षा मंत्री मा.आदिती तटकरे यांना भेटल्यावर त्यांनी ही समिती सर्व एकल महिलांसाठी करून ती समिती आता सर्व एकल महिलांसाठी काम करणार आहे. राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. 
२) शिक्षण विभागाने राज्यातील सर्व एकल महिलांच्या मुलांची संख्या एकत्र करण्याचा निर्णय घेतला व राज्यातील सर्व शाळेत शिकणाऱ्या मुलांची संख्या आमच्या विनंतीवरून 
संकलित होते आहे.
३) उमेद अभियानाने एकल महिलांच्या रोजगारासाठी प्राधान्यक्रम देण्याचे पत्र काढले आहे.
४) मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबवण्याचे पत्र काढून सर्व जिल्ह्यात एकल महिलांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत 
५) अहिल्या नगर जिल्ह्यात एक महिलांचे सर्वेक्षण झाले त्यानंतर पुणे जिल्ह्यानेही एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम सुरू केला आहे 
६) नाशिक जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण होत आले असून तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी एकल महिलांशी विधवा महिलांशी विवाह केला तर त्या महिलेच्या मुलांच्या नावावर एक लाखाची ठेव पावती करणारी अभिनव घोषणा केली व एकल महिने व्यवसाय केल्यास त्याची व्याज जिल्हा परिषद भरणार आहे 
७) सिंधुदुर्ग भंडारा यवतमाळ रत्नागिरी सांगली सातारा गडचिरोली वर्धा अकोला गोंदिया येथील जिल्हा प्रशासनाने एकल महिलांच्या प्रश्नावर सकारात्मक दृष्टिकोन घेतला असून  या जिल्ह्यांमध्येही एका महिला विषयी काम सुरू झाले आहे किंवा होते आहे.
८) गडचिरोली सारख्या दुर्गा जिल्ह्यातही एक महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहेत
कोणतीही मोठी ताकद नसताना जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी संवेदनशील प्रतिसाद देऊन या महिलांना आधार देण्याची भूमिका घेत आहे या अत्यंत समाधानाची व उमेद उंचावणारी होणारी गोष्ट आहे….
आपणही या कामात सहभागी व्हा….
तुमच्या परिसरातील एकल महिलांचे काम सुरू करा. मेसेज करून कुठे काम करणार ते कळवा..
हेरंब कुलकर्णी 
राज्य निमंत्रक 
 साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र 
8208589195
Previous Post

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आमदार नारायण पाटील यांनी महावितरणचा घेतला आढावा

Next Post

अक्कलकोटचे डॉ. धानय्य कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३०९ विद्यार्थी के-सेट परीक्षेत उत्तीर्ण

Admin

Admin

Next Post
अक्कलकोटचे डॉ. धानय्य कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३०९ विद्यार्थी के-सेट परीक्षेत उत्तीर्ण

अक्कलकोटचे डॉ. धानय्य कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३०९ विद्यार्थी के-सेट परीक्षेत उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157276
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697