Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

Admin by Admin
September 26, 2025
in महाराष्ट्र
0
राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

Oplus_0

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : -यंदाच्या मोसमात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.अतिवृष्टीचा फटका मराठवाडा आणि विदर्भाला सर्वाधिक बसल्यामुळे सरकारकडे मदतीसाठी मागणी केली जात आहे.त्यातच राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत करण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणी पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत केली जात असून*,
जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपयांची भरपाई दिली जात आहे.

राज्य सरकारने ही मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तर त्यांना उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आतापर्यंत पावसामुळे ८४ जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळेच फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे.

अवघ्या ८ दिवसांच्या आत ही मदत संबंधित पीडितांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.सरकारी निकषांनुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख तसेच दुधाळ जनावर दगावल्यास ३७ हजार ५०० रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.याशिवाय शेळी, मेंढी, बकरे आणि डुक्कर (वराह) दगावल्यासही प्रत्येकी ४ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.या प्रकरणी मोठ्या जनावरांची मर्यादा ३,तर छोट्या जनावरांची मर्यादा ३० इतकी ठेवण्यात आली आहे.

Previous Post

पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग  यांची जयंती विनम्र अभिवादन.

Next Post

सोलापूर जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Admin

Admin

Next Post
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आजपासून ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

सोलापूर जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157239
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697