Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सी. बी.खेडगी कॉलेज येथील संगणक विभागाचे  दलित सोनकांबळे  यांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Admin by Admin
July 14, 2026
in शैक्षणिक
0
सी. बी.खेडगी कॉलेज येथील संगणक विभागाचे  दलित सोनकांबळे  यांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी.खेडगी कॉलेज येथील संगणक विभागाचे  दलित वसंत सोनकांबळे  यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार मा. उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे  यांच्या शुभहस्ते मिळाला.  हा पुरस्कार दरवर्षी विविध सामाजिक , शैक्षणिक,सांस्कृतिक, कला क्रीडा पत्रकारिता ,व प्रशासकीय , पोलीस विधी तसेच ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.  दिनांक १२ जुलै रोजी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे संकल्प बहुउद्देशीय संस्था व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने  राज्यस्तरीय कर्तव्य दक्ष पुरस्काराचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता, या समारंभात विविध मान्यवर उपस्थित होते.  प्रमुख पाहुणे म्हणून शेगावचे नगराध्यक्ष मा.प्रकाश शोगोकार उपनगराध्यक्ष सौ वैशाली सुळ व शेगावचे तहसीलदार  सौ प्रज्ञा काकडे व विभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील , नगरसेवक गजानन कांबळे , नगरसेविका सौ सीमा ओवे, समाजसेवक जीवन डिगे कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र इंगळे व  ग्रामीण युवा संस्थेचे अध्यक्ष  सतीश हातोळे व संस्थेच्या सचिवा प्रतीक्षा इंगळे संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यप्रसंगी प्रा.संजय खडसे आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की आज मिळालेले यश ही तुमच्या प्रवासाची सुरुवात आहे, शेवट नाही. यशाने हुरळून न जाता, नम्र राहून आपले प्रयत्न असेच पुढे सुरू ठेवा. समाजापुढे एक आदर्श निर्माण करा.पुरस्कार किंवा सन्मान ही केवळ एक वस्तू, मानपत्र किंवा ट्रॉफी नसते; तर ती तुम्ही घेतलेल्या परिश्रमांची, तुमच्या प्रामाणिकपणाची आणि तुमच्या कौशल्याची मिळालेली जाहीर पावती असते. अशा प्रकारची भावना प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले
याप्रसंगी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनेक मान्यवरांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला.
याबद्दल संस्थेचे चेअरमन  बसलिंगप्पा खेडगी , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अंकुश शिंदे , उपप्राचार्य सौ वैदही वैद्य , पर्यवेक्षक प्रा. भरमशेट्टी  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
Previous Post

पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान

Next Post

अक्कलकोट येथे शिवसेना सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे शिवसेना सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड 

अक्कलकोट येथे शिवसेना सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157235
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697