पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची जयंती विनम्र अभिवादन.

त्यांचे जीवन आणि कार्य:
जन्म आणि सुरुवातीचे जीवन: मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अविभाजित भारतातल्या पंजाब प्रांतात झाला.
शिक्षण: त्यांनी पंजाब विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले आणि नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
१९९१ मधील आर्थिक सुधारणा: देशाच्या आर्थिक संकटाच्या काळात, तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडवून आणले, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था उदारीकरणाच्या मार्गावर आली.
पंतप्रधान म्हणून कार्यकाळ: २००४ ते २०१४ या काळात ते भारताचे पंतप्रधान होते. या कार्यकाळात त्यांनी देशाला स्थिर आणि विकसित करण्यावर भर दिला.
त्यांची ओळख: ते एक विचारवंत, अभ्यासक आणि शांत स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाप्रती असलेली व्यासंगी वृत्ती आणि विनम्र आचरण यामुळे ते आदराने पाहिले जातात.
वारसा: भारताच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण घडवून आणणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
डॉ. मनमोहनसिंग गुरुमुखसिंग कोहली (२६ सप्टेंबर, १९३२ – २६ डिसेंबर, २०२४) हे २२ मे २००४ पासून २६ मे २०१४पर्यन्त भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून जगात ओळख झाली.
सन १९५७ ते १९६५ – चन्दीगडमधील पंजाब विद्यापिठ प्राध्यापक.
- इ.स. १९६९-१९७१ – दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
- इ.स. १९७६ – दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक.
- इ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
- इ.स. १९८५ से १९८७ – भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष.
- इ.स. १९९० से १९९१ – भारतीय पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
- इ.स. १९९१ – नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमन्त्री.
- इ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
- इ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
- इ.स. १९९६ – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
- इ.स. १९९९ – दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
- इ.स. २००१ – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
- इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान
या शिवाय त्यांनी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.