Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळवून देण्यासाठी टेंभुर्णी काँग्रेस आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

Admin by Admin
July 15, 2026
in राजकीय
0
माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळवून देण्यासाठी टेंभुर्णी काँग्रेस आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी (प्रतिनिधी):
माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील चार महिन्यांपासून ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) मिळण्यात येत असलेल्या अडचणींबाबत टेंभुर्णी शहर काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कुर्डूवाडी येथील प्रांताधिकारी यांना आज एक अधिकृत असे निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या चार महिन्यांपासून माढा तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारूनही शेतकऱ्यांना आवश्यक असलेले फार्मर आयडी दिले जात नाहीत. तहसील प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सध्या जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आणि, गेल्यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. मात्र, प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अनेक शेतकरी अनेक सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. तालुक्याच्या खैरेवाडी येथील एका शेतकऱ्याचा फार्मर आयडी नसल्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे त्यांच्या हक्काचे ४२,००० रुपये मिळालेच नाहीत. त्यांच्यासारखे माढा तालुक्यातील सुमारे ११००० हून अधिक शेतकरी योजनांपासून वंचित राहिले आहेत.

शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असूनही कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे, प्रांताधिकारी यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून तहसील कार्यालयात एखाद्या विशेष ‘शिबीर’ आयोजित करावे आणि एका महिन्याच्या आत सर्व शेतकऱ्यांना त्यांचे फार्मर आयडी मिळवून द्यावेत अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. प्रशासनाने सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास टेंभुर्णी शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी शहराध्यक्ष हेमंत देशमुख, सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे कुर्डूवाडी शहराध्यक्ष हमीद शिकलकर, युवक काँग्रेस संगठनेचे जिल्हा समन्वयक सुर्यकांत लोंढे, शहर उपाध्यक्ष प्रथमेश यादव, यांच्यासह इतर पदाधिकारी इथे उपस्थित राहिले होते.

Previous Post

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रविराज गायकवाड यांचे निधन 

Next Post

टीईटी प्रश्नी संसदेत आवाज उठविणार —  खासदार प्रणिती शिंदे

Admin

Admin

Next Post
टीईटी प्रश्नी संसदेत आवाज उठविणार —  खासदार प्रणिती शिंदे

टीईटी प्रश्नी संसदेत आवाज उठविणार --  खासदार प्रणिती शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157235
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697