अक्कलकोट ( प्रतिनिधी ) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अक्कलकोट येथील सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती संचलित मूकबधिर निवासी शाळा अक्कलकोट येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानेविद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभय खोबरे माजी अध्यक्ष लायन राजेंद्र हत्ते , लायन विठ्ठल तेली , सचिव लायन शिरीष पंडित ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी लायन राजेंद्र हत्ते यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केल्याबद्दल या कार्यक्रमाचे कौतुक केले .एक चांगला उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने राबविण्यात आल्याची भावना व्यक्त केली.प्रारंभी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य स्वामीराव गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया सोलापूर लोकसभा अध्यक्ष राजेश कुमार जगताप ,पदाधिकारी रमेश भंडारी यांच्या सहकार्यातून कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बनसिद्ध कोरे विशेष शिक्षक हैबती वंजारे, बसवराज आळंद, दिलीप नरवडे, रामदास गुंडगिरे, सुषमा वांगे, संगीता शिंदे, कलाशिक्षक मच्छिंद्र अंगुले,गजानन गाडेकर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सुरेश भोसले क्लर्क बसवराज जिऊरे,इत्यादी उपस्थित होते. शेवटी आभार सुरेश भोसले यांनी मानले.
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697