सामाजिक
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिरात ३७९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दि. १५ ऑगस्ट रोजी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिरात ३७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदरचे रक्तदान शिबिर हे .पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले.. सदरचे रक्तदान करिता सिद्धेश्वर ब्लड सेंटर,सोलापूर यांचे जनसंपर्क अधिकारी नागेश तोलाराम चव्हाण व महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर,सोलापूर याचे जनसंपर्क अधिकारी संतोष गोविंद थोरात हे त्यांचे कर्मचारी सह हजर होते.सदरच्या रक्तदान शिबिराकरिता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी,पोलिस अंमलदार व पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभलेले आहे.अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही रक्तदान शिबीरात सहभागी होत रक्तदान केले.




