सोलापूर

मंगळवेढा येथे दलित पँथरच्या विविध पदाधिकाऱ्याचीं निवड

 सोलापूर ( प्रतिनिधी ) मंगळवेढा येथील दलित पॅंथर संघटनेच्या कार्यालयात दलित पॅंथर या संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी सांगोला येथील जयश्री मल्हारी सावंत यांची दलित पँथर  महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच माधुरी दामानी यांची सांगोला तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अशोक रणदिवे यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे यांच्या हस्ते देण्यात आले .सदरची निवड ही दलित पॅंथरच्या पक्षश्रेष्ठ मल्लिका नामदेव ढसाळ यांच्या आदेशाने दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून दलित पँथर ही संघटना तळागाळातील सर्वसामान्य माणूस , कष्टकरी ,शेतकरी , कामगार , दिन दलित यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविण्यासाठी कायम तत्पर असणार आहे असे प्रतिपादन दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे यांनी केले. याप्रसंगी अंकुश खवतोडे , प्रशांत कसबे, शोभा कांबळे, महेश कांबळे , टिराबाई कांबळे आदी उपस्थित होते. नूतन महिला आघाडी अध्यक्ष जयश्री सावंत यांनी दलित पँथर संघटनेचे काम ताकतीने करणार असल्याचे निवडीनंतर सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button