राजकीय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )- रक्तदान हे श्रेष्ठ असून यात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्येकर्त्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावे असे आव्हान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचने प्रमाणे एकाच दिवशी संपूर्ण राज्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार अक्कलकोट येथे भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल ५७४ रक्तदान जणानी रक्तदान केले. सदर शिबीराचे शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आमदार बोलत होते. प्रारंभी भारतमाता व श्री स्वामी समर्थ महाराज प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, सागर कल्याणशेट्टी, मनोज कल्याणशेट्टी, सुदर्शन यादव, विकास वाघमारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड, अमोल हिप्परगी, जेष्ठ प्रभाकर मजगे, शिवशरण जोजन, शिवशरण वाले, मल्लिनाथ स्वामी, प्रवीण शहा, संजय भागानगरे, सुनील गवंडी, मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, आनंद तानवडे, परमेश्वर यादवाड, गिरमल गंगोंडा, सभापती अप्पू परमशेट्टी, आणप्पा बाराचारी, सुरेश नागुर, आप्पासाहेब बिराजदार, शंकर भांजी, महेश पाटील, राजेंद्र बंदीछोडे, सुरेश गड्डी, रामचंद्र अरवत, सुनील सिद्धे, बसवराज हौदे, स्वामींनाथ हिप्परगी, शिवलिंग स्वामी,जयशेखर पाटील, राजशेखर हिप्परगी, शिवराज स्वामी, नागराज कुंभार, शबाब कोरबू,कांतू धनशेट्टी, अविनाश मडीखांबे, उत्तम गायकवाड, नंनू कोरबू, यशवंत धोंगडे, अप्पू पराणे, रजाक सय्यद, सुनील दसले,अंकुश चौगुले, विक्रम शिंदे, श्रीकांत झिपरे, कल्याणी बिराजदार, दिनेश पटेल,चंद्रकांत दसले यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सोसायटी चेअरमन, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य,प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक आदीजण उपस्थित होते.
यावेळी गोरक्षक दिना निमित्त वीस गोरक्षकांचे शाल, श्रीफळ, देऊन सन्मान करण्यात आले.



