सामाजिक

माणूसकी फाऊंडेशन अक्कलकोट यांच्यावतीने मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )माणूसकी फाउंडेशन अक्कलकोट च्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . आजच्या या स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपले कौशल्य दाखविण्यात कमी पडू नयेत म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.भविष्यातील सुसंस्कृत पिढी घडविण्याचा माणूसकी फाउंडेशन चा मानस आहे.
अक्कलकोट शहर व परीसरातील दुसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सोमवार दिनांक २१ जुलै २०२५  रोजी दुपारी तारामाता शाळा  येथे करण्यात आले . 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त  अमोलराजे भोसले , प्रथमेश  इंगळे, श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ योगेश वेळापूरकर , एच व्ही देसाई आय क्लिनिक चे डॉ सागर पवार, उद्योगपती मनोज निकम , न्यू लुक अकादमीच्या सुहासिनी सुरवसे  मेकअप आर्टिस्ट,सामाजिक कार्यकर्ते वैभव  नवले , शितल  फुटाणे आदीचीं उपस्थिती होती. 
यावेळी माणूसकी फाउंडेशन चे अध्यक्ष अनंत क्षीरसागर, उपाध्यक्ष आकाश शिंदे, सचिव आशिष हुंबे, अविनाश क्षिरसागर,योगेश महिंद्रकर, बाबूशा भालके, समर्थ शिरसाट मुख्याध्यापिका श्रीमती कदम , शिक्षक शेख , शिक्षक संगोळगी , शिक्षिका श्रीमती गोडसे , श्रीमती हरवाळकर , श्रीमती जाधव , पाटील आदी शिक्षक,शिक्षिका माणूसकी फाऊंडेशन सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख  यांनी केले.तसेच प्रास्ताविक मुख्याध्यापिका कदम यांनी केले व आभार रागिणी जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button