सामाजिक
मैंदर्गी येथील दलित समाज जागेच्या प्रश्नी बहुजन समाज पार्टीकडून अक्कलकोट तहसील कार्यालयावर मोर्चा
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील दलित समाजातील लोकांचे कब्जेवहिवाटीत असलेल्या सिटी सर्वे नंबर ५११ या जागेत गावातील जंगम समाजाच्या लोकांची स्मशानभूमी असल्याचे हक्क सांगून लोकांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याबाबत संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी अक्कलकोट विधानसभेच्या वतीने सोमवारी अक्कलकोट तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले.
अक्कलकोट शहरातील भीम नगर , मैंदर्गी रोड येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. राजे फत्तेसिंह चौक , जुना तहसील कार्यालय , कमलाराजे चौक येथून नवीन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाच्या रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव एडवोकेट संजीव सदाफुले यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले , मौजे मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथील सिटी सर्वे नंबर ५११ चे क्षेत्र ४ हजार ७८० चौरस मीटर इतके असून सदरची जागा ही गावठाणची आहे .सदर जागेत मातंग व महार समाजाची दहा ते बारा कुटुंबीयांची घरे आहेत. तसेच मोकळ्या जागेमध्ये मातंग समाजाचे पत्रा शेडचे सभागृह असून तेथे झेंडा व कट्टा आहे. सदर जागेत मातंग समाजाच्या वतीने महापुरुषांची जयंती तसेच इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. सदर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहाची मैंदर्गी नगर परिषदेकडे नोंद असून त्याचा टॅक्स समाजाच्या वतीने भरला जातो. तेथे केवळ दलित लोक वस्ती असून ती कब्जेवहिवाटीत आहे. सदर ठिकाणी जंगम समाजाची कोठेही स्मशानभूमी नाही. या ठिकाणी जंगम समाजातील काही लोक जंगम समाजास व इतर लोकांना भडकावून दलित बांधवांना या जागेतून हुसकावून लावण्याच्या उद्देशाने दमदाटी करत आहेत. त्यामुळे मातंग समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. वास्तविक पाहता जंगम समाजाचा सदर जागेची काही एक संबंध नाही. यासंबंधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून दलित बांधवांवर अन्याय करत असून हे बहुजन समाज पार्टी खपवून घेणार नाही. याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सभागृह बांधण्यात यावे असे सांगितले. या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा सोलापूरचे माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांनी मैंदर्गी येथील दलित बांधवांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा लोकशाही मार्गाने बहुजन समाज पार्टीचा पुढचा मोर्चा हा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरावर काढू असे सांगितले. याप्रसंगी बसपा प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे , मुस्लिम भाईचारा प्रदेश संयोजक रशीद सरदार , कोषाध्यक्ष सुहास सुरवसे, अक्कलकोट विधानसभा अध्यक्ष विठ्ठल आरेनवरू , आदींनी मार्गदर्शन केले. अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर यांना बसपा कडून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सचिव एडवोकेट संजीव सदाफुले , प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष तथा सोलापूरच्या माजी नगरसेवक बबलू गायकवाड ,मुस्लिम भाईचारा प्रदेश संयोजक रशीद सरदार ,कोषाध्यक्ष सुहास सुरवसे , अक्कलकोट तालुका अध्यक्ष विठ्ठल आरेनवरू , उपाध्यक्ष धर्मा गायछोडे , महासचिव अशोक बनसोडे, दुधनी सेक्टर अध्यक्ष बसवराज जन्ना, सातलिंग निंबाळ, बसपा नेते सैदप्पा झळकी, मैंदर्गी उपाध्यक्ष संभाजी मातंग, शिवचलप्पा नाटीकर , बसवराज तुकाराम आरेनवरू , विश्वनाथ इटेनवरू, सुनिता नाटीकर , संजय नाटीकर , चन्नम्मा विठ्ठल अरेनवरू , सुनंदा अरेनवरू ,आकाश आरेनवरू , इरफान पठाण , सैफन मकानदार ,सिराज जमादार , निसार शेख , वागदरीचे ज्ञानेश्वर नडगिरे , रामा गायकवाड , प्रभाकर कांबळे आदींसह मैंदर्गी व अक्कलकोट तालुक्यातील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी , कार्यकर्ते ,नागरिक , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



