शैक्षणिक

दहिटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये यश

 

सोलापूर ( प्रतिनिधी )
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सी.एस हॅकॅथॉन उत्सवामध्ये जिल्ह्यातील ४८०९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३० विद्यार्थी व १० शिक्षकांची जिल्हास्तरावर या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.

हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये शाळेचे विद्यार्थी कु नंदिनी बायस, संघदीप गायकवाड, कु समृद्धी बनसोडे या विद्यार्थ्यांनी मुलींच्या शिक्षणख बाबतच्या समस्या या समस्येवर आधारित स्क्रॅच कोडींग चा वापर करून एक मेस गेम तयार केला होता.

या प्रकल्पाचा जिल्ह्यातील तिसरा क्रमांक दहिटणे येथील जि.प.प्राथ.शाळेला मिळाला शिक्षक मुश्रीफ शेख, शिक्षिका साबेरा मुजावर , शिक्षिका सुजाता घोळवे यांचे मार्गदर्शन मिळाले.

अमेझॉन फ्युचर इंजिनियर, कोड टू इन्हान्स लर्निंग, लीडरशिप फोर इक्विटी या संस्थांकडून एक एलईडी टीव्ही, तीन टॅबलेट कॉम्प्युटर, एक अमेझॉन एलेक्सा व एक कम्प्युटिंग किट विद्यार्थी व मार्गदर्शकांना प्रमाणपत्र व मेडल बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

विजेते विद्यार्थ्यांचे जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, पंचायत समिती उत्तरचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी , विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा महादेवी गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक कुंभार यांनी अभिनंदन केले व भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

दहिटणे परिसरात सर्वत्र मुलांचे व शाळेचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button