Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पुण्यात मोठी दुर्घटना, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

Admin by Admin
June 15, 2025
in महाराष्ट्र
0
पुण्यात मोठी दुर्घटना, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे – आज रविवार असल्याने मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाळा असल्याने या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट देतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. मात्र हा पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20-25 लोक वाहून गेले आहे. अशातच आता इंद्रायणी नदीवरील हा पूल का कोसळला या मागील कारण समोर आले आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी नदीवरील हा दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता. त्यामुळे हा पूल जास्त वजन सहण करण्यास अक्षम होता. परिणामी पर्यटकांचे जास्त वजन झाल्याने हा पूल क्षणात कोसळला. या पुलाचे थेट दोन तुकडे झाले. हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता. असे असताना या पुलावरून जास्त वजन असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या. अपघातावेळीही या पुलावरून दुचाकी जात होती. तसेच पर्यटकही एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जात होते. हा पूल हवेतही हलत होता. या सर्व बाबींमुळे पूल ओव्हरवेट झाला आणि क्षणात कोसळला.
 रविवार असल्याने आज शासकीय तसेच खासगी कार्यालये तसेच शाळांना सुट्टी होती. त्यामुळे आज कुंडमळा हे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढली. हा पूल अगोदरच जीर्ण झालेला होता. त्यामुळे तो अचानकपणे कोसळला आणि पुलावरून जाणारे 20 ते 25 पर्यटक अचानक इंद्रायणी नदीत कोसळले.
 मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या जवानांना आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. या भागात स्थानिक पोलीसही पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत या भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे इंद्रायणी नदी सध्या ओसंडून वाहते आहे. त्यामुळे वाहून गेलेले पर्यटक नेमके किती दूर गेले असतील, याचा अंदाज एनडीआरएफच्या जवानांकडून घेतल जात आहे आणि बचावकार्य केले जात आहे.
Previous Post

अक्कलकोट शहर बस स्थानक येथील दक्षिण बाजूस पायवाट सुरू करण्याच्या मागणीला माजी गृहराज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या शिष्टाई मुळे यश

Next Post

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान – आमदार सचिन कल्याणशेट्टी

Admin

Admin

Next Post
अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान - आमदार सचिन कल्याणशेट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697