Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान – आमदार सचिन कल्याणशेट्टी

Admin by Admin
June 15, 2025
in सामाजिक
0
अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान – आमदार सचिन कल्याणशेट्टी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून शहरातील राजेफत्तेसिंह क्रीडांगणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून संस्थानकालीन वारसा जपत आहेत, अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान असल्याचे मनोगत आमदार-सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने राजेफत्तेसिंह क्रीडांगण येथे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम आमदार-सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी हे बोलत होते. अध्यक्ष स्थानी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले हे होते. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे  भोसले, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अक्कलकोट नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी शैलेश बिराजदार हे उपस्थित होते. दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
प्रास्ताविक करताना जन्मेजयराजे  भोसले म्हणाले महाराष्ट्र शासन, राज्याचे मुख्यमत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यभरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करीत आहे, अन्नछत्र या न्यासाकडून जनहितार्थ विविध उपक्रम हाती घेत असताना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याला महत्व देत कार्यरत आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले, संस्थान काळातील गावामध्ये दुतर्फा वडाची वृक्ष असायची मात्र काळानुरूप ती आता पहायला मिळत नाही, मात्र अन्नछत्र मंडळाने सोलापूर रस्त्यावर दुतर्फा वृक्षांची लागवड करण्यात आली. सदरची लागवड ही वळसंग व पुढे सोलापूर शहराच्या सीमेपर्यंत करण्यात येणार होती, मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सदरची झाडे लावण्यात येणार असल्याने वृक्षारोपण करता आले नाही. पुढील काळात शहरातील शासकीय जागेसह अन्य ठिकाणी अन्नछत्र मंडळाकडून वृक्षारोपण व संवर्धन मागणी नुसार करण्यात येणार असल्याचे जन्मेजयराजे  भोसले म्हणाले.
पुढे बोलताना आमदार-सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र परिवार विविध क्षेत्रात पुढाकार घेत चांगले काम करत आहे, या परिवारासोबत खारीचा वाटा उचलत  लोकसेवक म्हणून व कल्याणशेट्टी परिवार कायम सोबत राहू असे सांगून, श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये अन्नछत्र या न्यासामुळे विकासात भर पडत आहे. असे आमदार कल्याणशेट्टी म्हणाले. या प्रसंगी त्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या बाबतचे महत्व त्यांनी स्पष्ट करून सांगितले. अन्नछत्र मंडळाचे कार्य सातासमुद्रापार जावो अश्या शुभेच्छा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केल्या.
चौकट – 
राम-लक्ष्मणाच्या जोडीला माझे नेहमीच सहकार्य राहील-
आमदार- सचिन कल्याणशेट्टी व त्यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे श्री क्षेत्र अक्कलकोटच्या चौफेर विकासासाठी सतत झटणारे नेतृत्व लाभले आहे. विकास कार्यात आजवरच्या लोकप्रतिनिधी मध्ये आ. सचिन कल्याणशेट्टी हे अव्वल ठरले आहे. विकासाच्या माध्यमातून तीर्थ क्षेत्र नगरीचा चेहरा- मोहरा बदलण्याचे महत्वपूर्ण काम ते करीत आहेत. त्यांना मोलाची साथ मिलन कल्याणशेट्टी हे देत आहेत. श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकास कार्यासाठी राम-लक्ष्मणाच्या जोडीला माझी खंबीर साथ राहणार आहे. 
    जन्मेजयराजे  भोसले
संस्थापक अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट
या प्रसंगी विद्याधर गुरव, धुळप्पा बजे, यांची समयोचित भाषणे झाली. 
या कार्यक्रमास मॉर्निंग, सुप्रभात ग्रुप, निसर्ग सेवा फाउंडेशन चे पदाधिकारी, सदस्य आणि अमोलराजे जन्मेजयराजे भोसले मित्र मंडळ व लेझीम संघ सह अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, लाला राठोड, संतोष भोसले, अॅड. संतोष खोबरे, मनोज निकम, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, प्रा. शिवशरण अचलेर, प्रभाकर मजगे, प्रवीण शहा, शिवलिंग स्वामी, सुनील गोरे, प्रमोद लोकापुरे, मतीन पटेल, उमेश पाटील चप्पळगांव, अलीबाशा अत्तार, मैनुद्दीन कोरबू, सरफराज शेख, राजशेखर हिप्परगी, विलासराव कोरे, शिवराज स्वामी, नरसिंग क्षीरसागर, अश्पाक काझी, धनंजय गाढवे, नागेश कलशेट्टी,, बाळासाहेब कुलकर्णी बाबलादकर, राचप्पा वागदरे, अभिमन्यू ताड, माळी मामा,  सोमशेखर जमशेट्टी, गोटू माने, राहुल इंडे, महांतेश स्वामी, स्वामिनाथ बाबर यांच्या सह वृक्ष मित्र बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विविध मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. प्रकाश सुरवसे तर आभार प्रा. मनोज जगताप यांनी मानले.
Previous Post

पुण्यात मोठी दुर्घटना, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

Next Post

अक्कलकोट येथे बौद्ध समाजातील १० व १२ उत्तीर्ण विद्यार्थी – विद्यार्थीनीच्यां सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथे बौद्ध समाजातील १० व १२ उत्तीर्ण विद्यार्थी – विद्यार्थीनीच्यां सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

अक्कलकोट येथे बौद्ध समाजातील १० व १२ उत्तीर्ण विद्यार्थी - विद्यार्थीनीच्यां सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697