महाराष्ट्र

त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

 

पुणे ( अशोक शिवशरण )महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री  अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावरती जनता दरबारासाठी आले असता त्यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा 7 फेब्रुवारी जन्मदिन व 27 मे स्मृतिदिन महाराष्ट्र राज्य शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा यासाठी निवेदन दिले. 3 ते 4 वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहाने बहुमताने हा ठराव केला असून अद्यापही त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा 7 फेब्रुवारी जयंती दिन व 27 मे स्मृतिदिन साजरा होत नाही हे देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी समितीचे निमंत्रक .बाळासाहेब रोकडे,.बापूसाहेब गायकवाड,दशरथ ठाणांबीर,संतोष जोगदंड,बाबासाहेब वाघमारे,तुकाराम गायकवाड,दीपक भालेराव,.प्रमोद शेरे आदी मान्यवर उपस्थित. होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button