Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल दिड तास रास्ता रोको..

Admin by Admin
June 6, 2025
in महाराष्ट्र
0
माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल दिड तास रास्ता रोको..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजलगाव तेलगाव रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास मंत्र्यासह सत्ताधारी आमदारांना फिरू देणार नाही.. भाई ॲड.नारायण गोले पाटील

माजलगाव / बीड ( नाजेर कुरेशी ).माजलगाव शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग 548 सी माजलगाव तेलगाव रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्त्याला प्रचंड भेगा पडल्या आहेत, दररोज रस्त्यावर अपघातात अनेक बळी जात आहेत, या रस्त्यावर आजपर्यंत शेकडो बळी गेलेले असुन शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे, तर शेकडो घरे सदरील रस्त्यावरील अपघाताने उध्वस्त झाले असून अनेक कुटुंबाचा आधार हरवलेला आहे, अक्षरशः हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून शासनाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असून लोकप्रतिनिधी सदरील रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुशासनास सामान्य जनता कंटाळलेली असून रस्त्यावरील अपघाताची मालिका थांबवण्यासाठी रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १०:००ते ११:३०वा.शेकापच्या वतीने तब्बल दिड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शपा, समाजवादी पार्टी, मौलाना आझाद कलाम युवा मंच, राष्ट्रीय काँग्रेस, डी वाय एफ आय, संभाजी ब्रिगेड शिवसेना उबाठा यांच्यासह विविध पक्ष संघटना सह हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला, तब्बल तीन -तिन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या वेळी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला होता, यावेळी बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी शासनाला माजलगाव तेलगाव रस्त्यावर अजून किती बळी हवे आहेत..? असा संतृप्त सवाल विचारत माजलगाव तेलगाव रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण न झाल्यास सरकारातील मंत्र्यासह सत्ताधारी आमदारांना शेतकरी कामगार पक्ष माजलगाव मतदार संघात फिरू देणार नाही असाही इशारा दिला, या आंदोलनासाठी सलीम खान, नुमान भाई चाऊस, भाई मुंजा पांचाळ, भाई अशोक कुलकर्णी, नवीवोदिन सिद्दिकी, काँग्रेसचे हरिभाऊ सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस शपा चे विश्वांभर तावरे, सतीश बुरंगे, परमेश्वर डाके, तुकाराम नावडकर, नारायण तौर, सिद्धेश्वर काळे, विलास जावळे, सय्यद फारुख, अभिषेक सोळंके राहुल सोळंके पत्रकार नाजेर कुरेशी, भास्कर कांबळे, सचिन पांचाळ, हनुमान पांचाळ, अविनाश गोंडे, दत्ता कांबळे, जयराम राऊत, श्रीराम शेवाळे, श्रीकृष्ण कुरे, बालासाहेब फपाळ, बालासाहेब येवले, डॉ. मनसबदार, राहुल सोनगुडे आदींनी परिश्रम घेतले व शेवटी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने तलाठी रूपचंद आभारे यांनी आंदोलकाचे निवेदन स्वीकारले..

Previous Post

कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार :मल्लिकार्जुन पाटील 

Next Post

दहा रुपये आणि विस रूपयांची फाटकी नोट बाजारात घेण्यास नकार, वयस्कर व्यक्तीस व नागरिकांना त्रास

Admin

Admin

Next Post
दहा रुपये आणि विस रूपयांची फाटकी नोट बाजारात घेण्यास नकार, वयस्कर व्यक्तीस व नागरिकांना त्रास

दहा रुपये आणि विस रूपयांची फाटकी नोट बाजारात घेण्यास नकार, वयस्कर व्यक्तीस व नागरिकांना त्रास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697