महाराष्ट्र

शेतकरी नेते मा. आ. बच्चूभाऊ कडू यांची शेतकरी – शेतमजूर मेंढपाळ हक्क सभा

 

सोनपेठ ( मंजूर मुल्ला ) मा.मंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चु कडु यांची रवीवारी नरवाडी येथे शेतकरी – शेतमजूर मेंढपाळ यांची हक्क सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रचाराची सुरवात दि.१२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन करण्यात आली.
माजी मंत्री शेतकरी नेते बच्चु कडु यांनी राज्यातील शेतकरी,शेतजुर, मेंढपाळ,दिव्यांग,निराधार,यासह समाजातील विविध घटकांच्या हक्कासाठी एका हक्क यात्रेचे आयोजन केले आहे. हि हक्क यात्रा दि.१४ रोजी सोनपेठ येथे येणार असुन सायंकाळी नरवाडी येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रचाराची सुरुवात सोनपेठ शहरातुन करण्यात आली .या वेळी सुधीर बिंदू, शेतकरी संघटनेचे गणेश पाटील,विश्वंभर गोरवे, माधव जाधव, सोमनाथ नागुरे यांच्या सह शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी जाहीर करावी, कृषी मालाला हमी भावावर २०% अनुदान देण्यात यावे, शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन ५ लाख रु. अनुदान द्यावे, पेरणी ते कापणीचा सर्व खर्च रोजगार हमी मधुन करावा,नागपुर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या दराप्रमाणेच नांदेड-जालना समृद्धी महामार्ग व शक्तीपीठ महामार्गाला दर देण्यात यावा,नांदेड – जालना समृद्धी महामार्ग व शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प बाधीत शेत‌कऱ्याचा या प्रकल्पाला विरोध असल्याने शेतकऱ्याच्या जमीनी शासनाने बळजबरी हस्तांतरीत करु नये,दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक ६ हजार रुपये मानधन मिळावे,मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करुन त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा या मागण्यासाठी रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ सायंकाळीं ०६ वाजता मारोती मंदिर सभागृह नरवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी सोनपेठ तालुक्यातील समस्त शेतकरी, शेतमजुर, मेंढपाळ, दिव्यांग, निराधार, विधवा भगीनी व ग्राम पंचायत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
प्रहार संघटनेचे अशोक मस्के,सुभाष जोगदंड,दिपक खुडे,माणिक राठोड,डिगांबर पुरी, संगीता गायकवाड यांच्या सह नरवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button