Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

उडगी – तोळणूर अर्धवट रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांचीं मागणी 

Admin by Admin
May 28, 2026
in सामाजिक
0
उडगी – तोळणूर अर्धवट रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांचीं मागणी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 अक्कलकोट तालुक्यातील उडगी ते तोळणूर हा रस्ता खराब झाला असून रस्त्यातील खडी उखडली आहे .सदरचा रस्ता हा दुरुस्त करून  उडगी व  तोळणूर ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी उडगी व तोळणूर ग्रामस्थांकडून  केली जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. पण ठेकेदाराकडून हा रस्ता अर्धवट बनवून काम थांबविण्यात आले आहे. सदरचा अर्धवट रस्ता दुरुस्त करून उडगी व तोळणुर भागातील शेतकरी व नागरिकानां न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.
अक्कलकोट ते तोळणूर हे अंतर बासलेगाव – उडगी मार्गे १६ किलोमीटरचे आहे .तर नागणसूर मार्गे २३ किलोमीटरचे आहे. सध्या  उडगी मार्गे तोळणूर या ठिकाणचा रस्ता खराब झाला असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडली आहे.  उडगी मार्गे तोळणूर हा कमी अंतराचा रस्ता खराब झाल्याने या मार्गावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे .या रस्त्यावरून दुचाकी वाहन चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे.  उडगी ते  तोळणूर रस्ता हा दुरुस्त करून या मार्गे बस गाडी सोडण्यात यावी अशी मागणी तोळणूर ग्रामस्थांनी केली आहे. अक्कलकोट बासलेगाव ते तोळणूर हे अंतर कमी असून हे १६ किलोमीटरचे आहे. तर अक्कलकोट ते नागणसूर -तोळणूर हे अंतर २३ किलोमीटरचे आहे. अक्कलकोट – बासलेगाव ते तोळणूर हे अंतर कमी असल्याने नागरिकांचा तसेच शालेय विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उडगी – तोळणूर रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून अर्धवट करण्यात आले आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांच्या सोयीसाठी सदरचा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Previous Post

डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य 

Next Post

राजकारणातील ‘धैर्याचा’ महामंत्र

Admin

Admin

Next Post
राजकारणातील ‘धैर्याचा’ महामंत्र

राजकारणातील 'धैर्याचा' महामंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697