Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन झाला सन्मान

Admin by Admin
May 26, 2026
in सामाजिक
0
कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन झाला सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
          नामस्मरणातून मनःशांती, आत्मबल आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. स्वामींच्या चरणी श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर प्रत्येक भक्ताच्या जीवनात चमत्कार घडतात, कारण श्री स्वामी समर्थांच्या नामात जीवनातील संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य आहे असे भावोद्गार येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन , नगरसेवक महेश इंगळे यांनी काढले. 
        अधिक मासाच्या पवित्र पर्वाच्या निमीत्ताने कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने
आंबेवाडी कोल्हापूर येथील दत्त समर्थ सांस्कृतिक भवन येथे हजारो भाविकांच्या उत्स्फुर्त सहभागाने श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण सोहळा अत्यंत भक्तीमय, उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात 
नुकतच संपन्न झाला. या वेळी कोल्हापूर वासीय स्वामी भक्त यांची निस्सीम स्वामी भक्ती व या नामस्मरण सोहळ्यास संबोधीत करताना नगरसेवक महेश इंगळे यांनी वरील भावोद्गार काढले. 
        या वेळी चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचा इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुहास पाटील व सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील महेश इंगळे कुटूंबियांच्या पिढीजात स्वामी सेवेप्रित्यर्थ महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यास येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित भक्तांकडून महेश इंगळे यांचे औक्षण करून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत उत्साहात स्वागत करण्यात आले. सुहास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात महेश इंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम, उद्योजक नितीन वाडीकर, कृपासिंधु चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटील, करवीर पंचायत समितीचे सदस्य रविंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
        सामाजिक, सेवाभावी आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी भक्तांचा प्रमुख पाहुणे महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी महेश इंगळे यांची सभागृहात प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत महेश इंगळे यांनी अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानाचे महत्त्व, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला, नामस्मरणाची शक्ती आणि भक्तीमधील सातत्य याविषयी अत्यंत हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमामुळे कोल्हापूर परिसरात भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे नियोजन चोपदार नारायण यादव, मनोज माने, रमेश माने, वेणू सुतार, यशवंत चव्हाण आदींनी केले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम, रविंद्र पाटील, महेश मालक इंगळे मित्र परिवारातील प्रा.शिवशरण अचलेर , अंकुश केत, ज्ञानेश्वर भोसले, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, सोमनाथ सुतार, सागर गोंडाळ, श्रीकांत झिपरे, मनोज जगताप , विश्वनाथ देवरमनी, कुमार हत्तुरे, कलशेट्टी, विद्याधर गुरव , रमेश शिंदे , सुनिल पवार, काका सुतार, सुरेश वाले , ओमकार उटगे, स्वामीनाथ मुसळे, अमर पाटील, संदीप पंडीत, नामदेव माने आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

सोयाबीनला पीकविमा, कांद्याला हमीभाव द्या; डिझेल तुटवडा, खत-बियाणे व इंधन दरवाढ तात्काळ कमी करा — अन्यथा जनआक्रोश तीव्र करू : खासदार प्रणिती शिंदे

Next Post

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून अचानक पेट्रोल पंपाची तपासणी 

Admin

Admin

Next Post
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून अचानक पेट्रोल पंपाची तपासणी 

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून अचानक पेट्रोल पंपाची तपासणी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697