सामाजिक
अक्कलकोट येथे सोमवारी भव्य बौध्द धम्म परिषद

अक्कलकोट ( प्रतिनिधी )भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त
अक्कलकोट येथे सोमवारी भव्य बौध्द धम्म परिषद आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार १९ मे २०२५ रोजी सकाळी ०९ ते ०६ पर्यंत विविध कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले आहेत.
या धम्म परिषदेचे उद्घाटन – थेरो भदंत भन्ते बी. सारीपुत्त (भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बौध्दाचार्य साहिल संजय कांबळे ,भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष,अक्कलकोट असणार आहेत.
पहिले सत्र स.०८ ते ०९ पंचशिल ध्वजारोहन समता सैनिक दल संचालन मानवंदना ,स.०९ ते ११ धम्मध्वज रॅली यश सिध्दी सैनिक दल भिक्खु संघास मानवंदना , दु.११:३० ते ०१ कार्यक्रमाचे उद्घाटन सामुदायिक बुध्द वंदना समारंभ प्रास्तावना, भन्ते गण स्वागत मान्यवरांचे स्वागत
दुसरे सत्र -दु.०३ ते ३:३० प्रमुख वक्त्या चें व श्रामनेर शिबीरार्थी यांचे मनोगत , दु.०४ ते ४:३० थेरो भदंत भंन्ते बी. सारीपुत्त यांची धम्मदेसना,
दु.०४:३० ते ०५ अध्यक्षांचे मनोगत पुरस्कार वितरण विशेष सत्कार प्रमाणपत्र वितरण आभार
दु.०५ ते ०५:३० आभार सरणतय समाप्ती असे कार्यक्रम होणार आहेत.
सदरची धम्म परिषद ही :प्रियदर्शनी मंगल कार्यालय अक्कलकोट येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक उपासिकानीं उपस्थित राहावे असे बौद्धाचार्य साहिल संजय कांबळे यांनी केले आहे.