Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जगा वेगळी माणसं

Admin by Admin
May 18, 2025
in टॉप न्यूज
0
जगा वेगळी माणसं
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हे आहेत वेंकटरमण.गेली 10 वर्ष ते गरिबांना फक्त एक रुपयात जेवण आणि नाश्ता देतात.आपल्या छोट्याशा हॉटेलमध्ये हेच जेवण ते गिऱ्हाईकाना 50 रुपयांला व नाश्ता 10 रुपयाला देतात.तरीही रोज 70 लोकांना ते फक्त एक रुपयात जेवण देतात हे कौतुकास्पदच.दररोज स्वतःच इतकं नुकसान करून घेऊन हॉटेल चालवणारा दुसरा मालक जगाच्या पाठीवर तुम्हाला सापडणार नाही.

तामिळनाडूमधील इरोडमध्ये इरोड जनरल हॉस्पिटल जवळ वेंकटरमण छोटंसं हॉटेल चालवतात.10 वर्षांपूर्वी एक गरीब बाई हॉस्पिटलमध्ये असलेल्या आपल्या नवऱ्यासाठी इडली घ्यायला आली. तिच्याकडे फक्त 10 रुपये होते.तेव्हा 10 रुपयात 6 इडली मिळायच्या.पण इडली संपल्यामुळे वेंकटरमणने तिला 10 रुपयात 3 डोसे देऊ केले.पण तिला 6 इडलीच हव्या होत्या ज्यामुळे मुलांचीही खाण्याची सोय झाली असती. ते ऐकून वेंकटने तिला तेवढ्याच पैशात 6 डोसे दिले.बस ती एवढीशी घटना जिने वेंकटच आयुष्य ढवळून काढलं. फार अस्वस्थ झाला तो अन दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटलमध्ये गेला.तिथे गरीब रुग्णांचे नातेवाईक दिवसभर उपाशी बसून असतात हे त्याला तिथल्या डॉक्टर नर्सेस कडून कळलं. त्याच क्षणी त्याने निर्णय घेतला आपण त्यांना अन्न पुरवायचे. खूप गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसाठी त्याने सकाळचा नाश्ता म्हणून इडली,डोसे द्यायला सुरुवात केली.बायकोला सोबत घेऊन त्यांना दुपारचं जेवण म्हणून भात,चपाती,डाळ,रसम,करी फक्त एक रुपयात द्यायला सुरुवात केली. रात्रीही अन्नाची सोय केली.वेंकटरमण त्यांच्याकडून फक्त एक रुपया का घेत होता तर त्यांना अन्नाची किंमत कळावी म्हणून.त्यांनी ते नासाडी करू नये म्हणून.वर्षामागून वर्ष उलटली तरी वेंकटरमणची ती दिन चर्या काही बदलली नाही. वेंकटरमण हा काही फार श्रीमंत माणूस नव्हता.कधी त्याच्या धंद्यात त्याला फटकाही बसत होता.तरीही तो आपलं ते सामाजिक कार्य करतच राहिला.आज दहा वर्षानी वेंकटरमण दररोज 70 टोकन वाटतो. त्यातील 10-15 सकाळचा नाश्ता ज्यात 3 इडली 2 डोसे,सांबर असते तर दुपारी 30-40 टोकन वाटतो ज्यात भात, चपाती,डाळ,रसम,करी असते.रात्रीही तसंच जेवण 15 लोकांसाठी असते.यात तो कधीही खंड पडू देत नाही हे विशेष.आता टोकनची संख्या 100 करायची त्याची इच्छा आहे.

असा हा वेंकटरमण.त्याची ही कहाणी वाचून तुम्ही काहीही करणार नाही हेही मला ठाऊक आहे. तरीही असे लोक आजही समाजात आहेत जे स्वतःच्या पोटाला चिमटा काढून असंख्य जीवांच्या जगण्याच्या संघर्षाला हातभार लावताहेत हे तुम्हाला कळावं आणि तुम्हीही फक्त टीचभर मदत कधीतरी त्यांना करावी इतकीच माझी अपेक्षा आहे. वेंकटरमण नावाच्या त्या देव माणसाला इथूनच सलाम करताना मी त्याच्या माणुसकीपुढे नतमस्तक झालोय. तुम्हीही व्हा आणि त्याच्या ह्या अफाट कार्यात त्याला उदंड आयुष्य लाभून लक्ष्मीचा वरद हस्त कायम त्याच्या पाठीशी राहो अशी माझ्याबरोबर प्रार्थना करा. वेंकटरमण, तुझ्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
संजीव पेडणेकर

Previous Post

अक्कलकोट येथे सोमवारी भव्य बौध्द धम्म परिषद

Next Post

संसदरत्न पुरस्काराने खा. वर्षा गायकवाड यांच्या कामाची देशात दखल 

Admin

Admin

Next Post
संसदरत्न पुरस्काराने खा. वर्षा गायकवाड यांच्या कामाची देशात दखल 

संसदरत्न पुरस्काराने खा. वर्षा गायकवाड यांच्या कामाची देशात दखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697