देश - विदेश
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची सरन्यायाधीश पदी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया निवड झाल्याबद्दल दिल्ली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकप्पा कांबळे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष धर्मा माने यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. न्यायमुर्ती भूषण गवई यांची नुकतीच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदी निवड झाली असून त्यांचा शपथविधी सोहळा दिल्ली येथे पार पडला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकप्पा कांबळे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष धर्मा माने सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई सह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.