Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

Admin by Admin
May 1, 2025
in महाराष्ट्र
0
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुंबई – दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आज आपण महाराष्ट्राचा 66 वा स्थापना दिन साजरा करत आहोत. 1 मे 1960 रोजी भाषिक राज्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
 स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सध्याचे महाराष्ट्र आणि गुजरात हे एकत्रितपणे बॉम्बे स्टेटचा भाग होते. मात्र भाषावार राज्य रचनेच्या मागणीमुळे मराठी आणि गुजराती भाषिकांत वेगवेगळ्या राज्यांसाठी मागणी वाढू लागली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने वेग घेतल्यावर अनेक आंदोलने झाली आणि अनेकांचा बळीही गेला. त्यांच्या बलिदानामुळेच शेवटी केंद्र सरकारने नमते घेतलं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. महाराष्ट्र दिनासोबतच 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे. 1886 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो. भारतातही कामगार अत्याचार आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवत होते. कार्यकर्त्यांचे नेतृत्व डाव्यांकडून केले जात होते. त्यांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर 1 मे 1923 रोजी चेन्नईत प्रथमच कामगार दिन साजरा करण्यात आला.
Previous Post

शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड

Next Post

आधुनिक धर्माचे प्रणेते बसवण्णा 

Admin

Admin

Next Post
आधुनिक धर्माचे प्रणेते बसवण्णा 

आधुनिक धर्माचे प्रणेते बसवण्णा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697