Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर अध्यक्ष पदी प्रकाश चांदोजी कांबळे यांची नियुक्ती

Admin by Admin
April 22, 2025
in सामाजिक
0
भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर अध्यक्ष पदी प्रकाश चांदोजी कांबळे यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे ( अशोक शिवशरण )आंबेडकरी व बौद्ध धम्म चळवळीतील युवा व कर्तृत्ववान नेतृत्व यांची यशस्वीपणे धूरा सांभाळणारे माजी श्रामणेर, बौद्धाचार्य व गेल्या ७ वर्षां पासून संस्थेच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे सांभाळून धम्म चळवळीस अतिशय गतीमान करण्याची भूमिका पार पाडणारे प्रकाश चां. कांबळे यांची भा.बौ. महासभा देहूरोड शहर शाखेच्या अध्यक्ष पदी तर अन्य २० सदस्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पुणे जिल्हा पश्चिम चे अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, सरचिटणीस रविकांत रणपिसे व खजिनदार दलितानंद थोरात यांनी कार्यकारिणीचे योगदान, कार्यपद्धती याची पूर्ण माहिती व प्रत्यक्ष मुलाखात घेऊन अध्यक्ष व अन्य पदाची नियुक्ती केली.
नांदेड येथील मुळ रहिवाशी असलेले प्रकाश कांबळे हे लहानपणां पासूनच चळवळीत सक्रीय असून आपल्या परिवारा सोबत किवळे येथे वास्तव्यास आल्यानंतर सामाजिक कार्या सोबतच धार्मिक कार्यात सहभागी झाले. काही दिवसातच संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या पदाची जबाबदारी चोखपणे पार पाडीत असल्याचे पाहून २०१८ मध्ये त्यांची भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली, तसेच समता सैनिक दलात प्लाटुन कमांडर पदावर असताना तन मन धन, वेळ, बुद्धी, वक्तृत्व, पुर्ण परिवारा सोबत चळवळीत स्वतःला झोकुन देऊन भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, समाजातील कुठलाही कार्यक्रम असो, धम्मसहल असो की लेणी संवर्धन असो, त्यासाठी त्यांचा सहभाग, आयोजन, नियोजन, जनसंपर्क, सोशल मिडिया द्वारे प्रचार प्रसार अशा प्रकारे असंख्य कार्यात सहभागी होऊन कृतीशील कार्य करणारे अष्टपैलू व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करणारे आयु. प्रकाश चां. कांबळे हे समाजातील सक्रीय व्यक्ती आहेत. ते स्वतः धम्मशील आहेतच पण संपूर्ण परिवाराला त्यांनी धम्मशील, कृतीशील आचरण कसे असावे या बाबत संस्कार दिले असल्याने त्यांचा परिवार तसेच गावा कडील नातेवाईक, मित्र परिवार यांना देखील धम्म सहलीस सहभागी होण्यास प्रवृत करीत असतात.
रोज मेहनत केल तरचं आपल्या संसाराचा गाढा चालू शकतो अशी परिस्थिती असताना देखील महापुरुषांच्या कर्तुत्वामुळे आपले अस्तित्व आहे हि कृतज्ञता बाळगून सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी असतात, ते मातृसंस्थेच्या वतीने आयोजित प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहून आपली जबाबदारी पार पाडीत असतात.
आपल्या सोबतच आपल्या मित्र परिवाराच देखील भल व्हाव हा ध्यास घेऊन आपल्या गावाकडील मित्र मंडळी व नातेवाईक यांना एकसंघ करण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे अनेकांना उर्जा देणारा प्रसंग आहे.
संस्थेच्या प्रत्येक कार्याचा आढावा आपल्या लेखणीद्वारे ग्रुप वर तसेच सोशल मिडिया द्वारे प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तयार केलेला मजकूर हा अतिशय विस्तृत व प्रभावी असतो.
समाजातील प्रत्येकाची भावना जाणून घेणारा, अतिशय हसमुख व मनमिळावू स्वभाव असल्यामुळे प्रकाश चां. कांबळे याची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था, महिला आघाडी , युवा मंच, रमाई विद्यार्थी निवास संकुल, भा. बौ. महासभा, महिला वार्डशाखा, समता सैनिक दल
पुणे जिल्हा पश्चिम व देहूरोड शहर शाखेतील सर्व सदस्य, केवळ संस्थेतीलच नव्हे तर समाजातील असंख्य अनुयायी व मान्यवरां कडून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

गुरु – शिष्याच्या पॅनलच्या लढतीकडे लागले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष ! 

Next Post

जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करा  , वंचित बहुजन आघाडी सोलापूर  शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Admin

Admin

Next Post
जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करा  ,  वंचित बहुजन आघाडी सोलापूर  शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करा  , वंचित बहुजन आघाडी सोलापूर  शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697