सामाजिक
हन्नूर येथील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी चंद्रमणी बाळशंकर निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
हन्नुर ता अक्कलकोट येथील न्यु भिम क्रांती तरूण मंडळ व लिंबुणी बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने थोर कायदे पंडित , महामानव , विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त चंद्रमणी बाळशंकर यांची एक मतांनी निवड करण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष उमेश बाळशंकर सचिव अजय दुपारगुडे सहसचिव रामचंद्र बाळशंकर खजिनदार लक्ष्मण बाळशंकर मिरवणूक प्रमुख संतोष बाळशंकर मिरवणूक प्रमुख गौतम बाळशंकर यांची निवड करण्यात आली. दिनांक २८ | ४ |२०२५ रोजी संध्याकाळी ठिक ९ वाजता भिम गीताचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दिनांक २९ | ४ |२०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता गावांतुन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी हन्नूर भागातील तसेच अक्कलकोट तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरावर प्रेम करणाऱ्या आंबेडकर प्रेमीनी या उत्सवास मोठ्या बहुसंख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन जयंती समितीचे अध्यक्ष चंद्रमणी बाळशंकर व पदाधिकाऱ्यानी केले आहे.
