माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे व सोलापूर शहर प्रमुख श्रीकांत कोळी यांचा अक्कलकोटात सत्कार

माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे व माहिती अधिकार संघटना सोलापूर शहर प्रमुख श्रीकांत कोळी यांनी प्रथमच अक्कलकोट माहिती अधिकार कार्यालय विजयनगर येथे भेट देऊन अक्कलकोट तालुका व शहर पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. अक्कलकोट तालुका व शहर माहिती अधिकार संघटने कडून जिल्हाध्यक्ष योगेश धुळे यांना श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर शहर प्रमुख श्रीकांत कोळी यांचाही सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी वैशाली हावनूर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. अक्कलकोट शहर अध्यक्ष समर्थ बिराजदार यांचाही योगेश सुळे यांनी सत्कार केले. अक्कलकोट शहर संघटक संदीप राचेटि अक्कलकोट तालुका माहिती अधिकार प्रचार संयोजक प्रवीण घाटगे अक्कलकोट तालुका माहिती अधिकार महिला आघाडी अनिता घोडके जयश्री कोलाटी वर्षा मेत्रे बसवराज गोरे समर्थ मसूती आकाश बबलाद अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष स्वामीनाथ हेगडे सर्व नूतन माहिती अधिकार पदाधिकाऱ्यांचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश सुळे व श्रीकांत कोळी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व माहिती अधिकार कार्याचे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.