सामाजिक
भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी . कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.. सोलापूर जिल्हा अध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने बौद्धांचे पवित्र ठिकाण बुद्धगया हे पूर्णपणे मुक्त करून बौद्धाच्यां हाती सोपविण्यात यावे. तसेच गेल्या पंधरा दिवसापासून बौद्ध समाजाच्या व बौद्ध भिक्खूंचे आंदोलन सुरुवात असून उपोषण चालू आहे .हिंदूच्या देवळात हिंदू चे पुजारी, मुस्लिम मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांचे मौलावी , ख्रिश्चनच्या चर्चमध्ये ख्रिश्चन चे पादरी असतात जैन मंदिरात जैन धर्मगुरू असतात शिख गुरुद्वारामध्ये सिख धर्मगुरू असतात मग
बोधगया येथील बुद्ध विहार हे बौद्धांच्या नियंत्रणाखाली असावे हि मागणी करण्यात आली.
बौद्ध महासंघाचे भिकू तसेच कार्यकर्ते हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कमिटी सोलापूर जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले. अधिनियम १९४९ हे रद्द करावे किंवा त्याच्यामध्ये बदल करावा.महाबोधी बुद्ध विहार बौद्ध धर्मागुरू यांच्या संपूर्ण नियंत्रणामध्ये असावे अशी मागणी करणारे तसेच उपोषणाला पाठिंबा दर्शवणारे पत्र हे महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्या द्वारे देण्यात आले. यावेळी भंते सारीपुत्त, जिल्हाध्यक्ष .कमलाकर कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष. रविंद्र कांबळे, उपासिका वैशाली उबाळे , एडवोकेट सुरेखा कांबळे, कस्तुरा कांबळे, द्रोपती शिवशरण, प्रशांत रेठरे, श्रीकांत गजघाटे, प्रकाश घटकांबळे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.