शैक्षणिक

अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे विभागीय आयुक्त यांनी खातेनिहाय चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याची रिपाइंची मागणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी  पुणे विभागीय आयुक्त यांच्या अधिकाराचा गैरवापर करत अक्कलकोट तालुक्यातील नियमबाह्य केलेल्या २१ बदल्या करुन शिक्षकांना शाळेच्या कामात अडथळा निर्माण करणे, मानसिक ञास देणे, कौटुंबिक ञास देणे, मैंदर्गी येथील मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांचे विनाकारण निलंबन करुन मागासवर्गीय मुख्याध्यापकावर अन्याय केल्याबद्दल प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे खातेनिहाय चौकशी करुन त्यांना निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिले. येत्या आठ दिवसांत जर प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर खातेनिहाय चौकशी झाली नाही तर रिपाइंच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button