सामाजिक

श्री सिद्धेश्वर फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण संपन्न

गोंदवलेकर महाराज जयंती साजरी 
सोलापूर ( प्रतिनिधी ): ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंतीच्या शुभमहुर्तावर साई मंदिर, होटगी तलाव परिसर येथे वृक्षारोपण संपन्न झाले. शासकीय अधिकारी मोहन वसंतराव मुळे आणि पल्लवी मोहन मुळे – शेळके यांच्या विवाह वर्धापन दिनानिमित्त सुमारे दहा ते बारा फुटी २१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यासाठी अरुण उपाध्ये  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
       श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे यांनी प्रत्येकाने आपला वाढदिवस, विवाह वर्धापन दिन, जयंती, पुण्यतिथी, वृक्षारोपणाने साजरे करण्याचे आवाहन या निमित्ताने केले. लहान बालकांपासून वयोवृद्धापर्यंत अनेकांनी या कार्यात उत्साहाने सहभाग घेतला. 
       याप्रसंगी फाउंडेशनचे डॉ. अनिल सर्जे, समन्वयक राजेंद्र बलसुरे, ईश्वर होळीमठ, गिरीश गुड्डद, बसवराज परांडकर पाटील, डॉ. मनोज देवकर, बलगार, गणेश पाटील औज, सोलापूरचे गाडगे बाबा यशवंत हिरापुरे, चंद्रकांत स्वामी, शशिकांत माकणे, गौरी सर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button