लोकनेते कै. वहीदपाशा पाटील प्रतिष्ठान तर्फे नागणसूर येथील वस्ती शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) नागणसूर येथील जिल्हा परिषद कन्नड हिप्परगी वस्ती शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकनेते कैलासवासी वहीदपाशा पाटील प्रतिष्ठान तोळनूर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते वहीदपाशा पाटील पिरजादे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीरपाशा पिरजादे पाटील होते. प्रारंभी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पिरपाशा पिरजादे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज दरगोंडा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशांत प्रचंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव शिवानंद बिराजदार गुरप्पा दरगोंडा तोरणूर चे लक्ष्मण हुलूर जमादार , श्रीमंत दरगोंडा , नागनाथ माड्याळ , कन्याकुमारी माड्याळ शीलवंती दरगोंडा , प्रेमा बनसोडे , मल्लिनाथ दरगोंडा , राजश्री प्रचंडे ,सिद्धाराम दरगोंडा , गंगाराम होटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पीरपाशा पिरजादे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मलकप्पा महादेव हिप्परगी यांनी केले. यावेळी शिक्षिका सीमा हिरतोट सह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.