Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नागनहळळी आश्रमशाळेत ७६ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Admin by Admin
January 28, 2025
in शैक्षणिक
0
नागनहळळी आश्रमशाळेत ७६ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
        अक्कलकोट (प्रतिनिधी):नागनहळळी येथील आश्रमशाळा शिक्षण संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात अला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव जावेद पटेल 
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विजयकुमार काकडे, अॅड. श्रीमती  हल्ले , अॅड. श्रीमती बाके , अॅड. पिरजादे , संस्थेचे उपाध्यक्ष अ. जलील पटेल ,  पत्रकार  मारुती बावडे, नंदकुमार जगदाळे,  रमेश भंडारी,  राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड,  मोहन बंदिछोडे नागनहळळी गावचे उपसरपंच रमेश चव्हाण,मोहन चव्हाण , प्राचार्य मुजावर आय. एम., मुख्याध्यापक रईस अहमद शेख आदी  उपस्थित होते.
   या प्रसंगी  माजी सैनिक सुभेदार वियजकुमार काकडे यांच्या शुभ हस्ते ध्वजरोहण करण्यात आला. प्रशालेतील विदयार्थ्यांनी संचलनाच्या माध्यमातून ध्वजाला मानवंदना दिली. सांस्कृतिक विभागातंर्गत अनेक देशभक्तीपर गीतगायन,नृत्ये व विदयार्थी मनोगते सादर करण्यात आली. कु. सानिका भोरे हिने राष्ट्रभाषेतून मनोगत व्यक्त करताना अतिशय मार्मिक शब्दात अनेक समस्यांची उकल करुन विदयार्थी म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली.
तसेच अॅड. पिरजादे  यांनी संस्थेचे आपल्या मनोगतात संस्थेने उपलब्ध करुन दिलेल्या शैक्षणिक व भौतिक सोयी सुविधा बद्दल गौरवदगार काढले. तसेच माजी सैनिक काकडे यांनी एक आदर्शवत आश्रमशाळा असल्याचा उल्लेख आपल्या मनोगतात केला. अॅड. श्रीमती  हल्ले  यांनी ही आश्रमशाळा एखादया कॉनव्हेंट शाळेपेक्षा कमी नाही असा उल्लेख केला.
    याप्रसंगी विशेष सन्मान म्हणून प्रशालेची माजी विदयार्थिनी कु. नागम्मा बजे हिची बांबू उडी या क्रिडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने आर्थिक मदत देवून तिचा यथोचित सन्मान करण्यात आला.
   आश्रमशाळा विभागाच्या जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेत शाळेतील विदयार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविल्याबददल त्या विदयार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व छोटीसी भेटवस्तू देउन गौरव करण्यात आला. वर्षभरात विदयार्थ्यांची सर्वागीण प्रगती लक्षात घेउन तीन विदयार्थी व विदयार्थीनीची आदर्श विदयार्थी म्हणून निवड करुन त्यांना प्रशस्तीपत्र व छोटीसी भेटवस्तू देउन त्यांचा सन्मान करण्यात आला.
    अध्यक्षयीय मनोगतात प्राचार्य . मुजावर आय. एम. यांनी विदयार्थ्यांना २१ व्या शतकातील आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पी. एस. सोनटक्के तर सूत्रसंचलन प्रा.चव्हाण एस.बी.व प्रा. जगताप एम. वाय. यांनी केली. तर आभार  बिराजदार बी. व्ही. यांनी मानले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Previous Post

दहिटणे ग्रामपंचायतीमध्ये अंध व्यक्तीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

Next Post

अक्कलकोट येथील पाटील व बिराजदार परिवाराच्या हुरडा महोत्सवाचे आम. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट येथील पाटील व बिराजदार परिवाराच्या हुरडा महोत्सवाचे आम. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

अक्कलकोट येथील पाटील व बिराजदार परिवाराच्या हुरडा महोत्सवाचे आम. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697